Team India | इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडिया ‘इतके’ दिवस क्वारंटाईन राहणार, जाणून घ्या विराटसेनेचा प्लॅन

टीम इंडिया (Team India) जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर (tour of England) जाणार आहे. या दौऱ्यात विराटसेना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (World Test Championship 2021) अंतिम सामना आणि इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

Team India | इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडिया 'इतके' दिवस क्वारंटाईन राहणार, जाणून घ्या विराटसेनेचा प्लॅन
टीम इंडिया (Team India)
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 10:28 PM

मुंबई : टीम इंडिया (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) आणि त्यानंतर कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर (India Tour England 2021) जाणार आहे. विराटसेना 18-22 जूनदरम्यान न्यूझीलंड विरुद्ध विजेतेपदासाठी भिडणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी टीम इंडिया भारतात 8 दिवस क्वारंटाईन राहणार आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. (Team India will be in the quarantine before the World Test Championship 2021 and the tour of England)

अधिकाऱ्याने काय म्हटलं?

“इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू 25 मे ला मुंबईत एकत्र जमतील. त्यानंतरच्या पुढील 8 दिवस हे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसह बायो बबलमध्ये राहतील. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघ 2 जूनला इंग्लंडसाठी रवाना होईल. त्यानंतर पुन्हा इंग्लंडला पोहचल्यानंतर या खेळाडूंना 10 दिवस क्वारंटाईन रहावं लागणार आहे. या दरम्यान खेळाडूंची कोरोना चाचणीही केली जाईल.

कुटुंबियांना सोबत घेऊन येण्याची परवानगी

भारतीय संघाचा 3 महिन्यांचा लांबलचक असा दौरा आहे. खेळाडूंना बायोबबलमध्ये राहणं आव्हानात्मक असंत. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेण्याची परवानगी दिली आहे.

विजेतेपदासाठी दोन्ही संघांमध्ये 18-22 जूनमध्ये लढत रंगेल. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाला 10 पेक्षा अधिक दिवसांचा अवधी असेल. अवघ्या काही महिन्यांपूर्वी इंग्लंड भारत दौऱ्यावर आली होती. या दौऱ्यातर भारताने इंग्लंडचा कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय अशा तिनही मालिकेत पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाचा वचपा घेण्याचा मानस इंग्लंडचा असेल. तर ही विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा मानस विराटसेनेचा असणार आहे. यामुळे कोणता संघ वरचढ ठरणार, हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 22 जून, साउथ्मपटन

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट आवश्यक)

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

संबंधित बातम्या :

कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावले, क्रीडा विश्वावर शोककळा

PHOTO | सचिन, विराटनंतर रिषभ पंत कोरोना विरुद्धच्या लढ्यात मैदानात, ‘या’ संस्थेद्वारे करणार मदत

(Team India will be in the quarantine before the World Test Championship 2021 and the tour of England)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.