Jos Buttler: जोस बटलरने जगातील सर्वात उंच झेल पकडण्याची केली किमया, Watch Video

World Record, Highest Cricket Catch: टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू असताना इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जोस बटलरच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे. कारण त्याने आतापर्यंत सर्वात उंच झेल पकडण्याची किमया केली आहे. त्याच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.

Jos Buttler: जोस बटलरने जगातील सर्वात उंच झेल पकडण्याची केली किमया, Watch Video
Jos Buttler: जोस बटलरने जगातील सर्वात उंच झेल पकडण्याची केली किमया, Watch Video
Image Credit source: England Cricket Twitter/Video Grab
| Updated on: Feb 12, 2026 | 5:48 PM

Jos Buttler World Record: इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जोस बटलरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सध्या जोस बटलर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खेळत आहे. असं असताना त्याच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. हा विक्रम टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नाही तर औपचारिक नोंदवला गेला आहे. पण या विक्रमाची नोंद क्रिकेट इतिहासात होणार यात काही शंका नाही. कारण जोस बटलरने आतापर्यंतचा जगातील सर्वात उंच झेल पकडला आहे. याची उंची 122 मीटर इतकी होती. इतक्या उंच झेल पकडण्यासाठी त्याचा अंदाज खूपच कठीण असतं. शेवटपर्यंत नजर चेंडूवर खिळवावी लागते. त्यामुळे त्याच्या झेलची चर्चा रंगली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने जोस बटलरचा सर्वात उंच झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जोस बटलरने पकडलेला झेल काही फलंदाजाने मारला नव्हता. तर एक ड्रोनच्या माध्यमातून 122 मीटर उंचीवरून टाकला होता. ही उंची 40 मजली इमारती इंतकी आहे. हा चेंडू वरून टाकल्यानंतर त्याच्यावर नजर खिळवून जोस बटलरने बरोबर पकडला. खरं तर इतक्या उंचीवरून आलेल्या चेंडूचा वेग खूपच अधिक असतो. त्यामुळे हा झेल पकडणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण झेल पकडताना त्याचा योग्य अंदाज असणं खूपच आवश्यक आहे. पण बटलरने हे आव्हान पेललं आणि सर्वात उंचीवरून आलेला झेल पकडून विक्रम नोंदवला. हा झेल पकडल्यानंतर जोस बटलरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओखाली प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेकांनी त्याच्या या झेलचं कौतुक केलं आहे.

झेल पकडल्यानंतर जोस बटलर धावत केविन पीटरसनकडे गेला. पीटरसननेही क्षणाचाही विलंब न करता बटलरने काय केलं? याबाबतची माहिती क्रीडाप्रेमींना दिली. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जोस बटलरची कामगिरी हवी तशी झालेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात इंग्लंडसाठी 23.50 च्या सरासरीने फक्त 47 धावा करू शकला. यात 31 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.