इंग्लंडनं तीन मुस्लिम क्रिकेटपटूंना पाठवलं भारतात, पाकिस्तान कनेक्शन समोर
इंग्लंडच्या क्रिकेट संघात गेल्या दोन दशकांमध्ये असं कधीही घडलं नाही, की या टीममध्ये एकही मुस्लिम क्रिकेटर नाही. इंग्लंडच्या संघामध्ये जेवढे काही मुस्लिम क्रिकेटपटू आहेत, ते सामान्यत: गोलंदाज आहेत.

इंग्लंडच्या क्रिकेट संघात गेल्या दोन दशकांमध्ये असं कधीही घडलं नाही, की या टीममध्ये एकही मुस्लिम क्रिकेटर नाही. इंग्लंडच्या संघामध्ये जेवढे काही मुस्लिम क्रिकेटपटू आहेत, ते सामान्यत: गोलंदाज आहेत. यावेळी जो इंग्लंडचा संघ भारतात आला आहे, त्यामध्ये तीन मुस्लिम क्रिकेटर आहेत. या क्रिकेटपटूंचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आहे, मात्र त्यांचे आईवडील रोजी रोटीच्या शोधात इंग्लंडमध्ये आले होते.
आता तुम्हाला अंदाज आलाच असेल आपण बोलत आहोत, रेहान अहमद, साकिब महमूद आणि आदिल रशीद यांच्याबद्दल. रेहान हा ऑलराउंडर असून तो लेगब्रेक गुगली गोलंदाजी करतो. साकीब महमूद हा डाव्या हाताचा फास्टर गोलंदाज आहे. तर आदिल रशीद लेगब्रेक गोलंदाज आहे. या तिनही खेळाडूंचे आई-वडील रोजगार आणि चांगल्या जीवनाच्या शोधात इंग्लंडला स्थाईक झाले. तिथेच या तीनही खेळाडूंचा जन्म झाला. या तिघांच्या आई-वडिलांनी इंग्लंडमध्ये मिळेल ते काम केलं. मात्र आता त्यांची मुलं क्रिकेटर झाल्यानं त्यांच्या नशिबाचं दार उघडलं आहे.
आदिलचे आई-वडील पाकिस्तानच्या मिरपूरचे रहिवासी होते, त्यांच्याकडे काही खास काम नव्हतं. त्यामुळे त्यांनी इंग्लंडला स्थलांतर केलं. एक मजूर म्हणून ते इंग्लंडला गेले. त्या काळात अनेक जण मजूर म्हणून पाकिस्तानातून इंग्लंडला जात होते. त्यांच्यासोबतच आदिलचे वडील देखील इंग्लंडला गेले.
आदिल राशिदचे आई-वडील देखील पाकिस्तानीच आहेत. ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. आदिलचा जन्म 17 फेब्रुवारी 1988 साली इंग्लंडमध्ये झाला. त्याच्या वडिलांची इच्छा होती त्याने क्रिकेटर व्हाव त्याने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली तर रेहानचे वडील पाकिस्तानी क्रिकेट संघात क्रिकेटपटू होते. ते नंतर इंग्लंडला स्थायिक झाले. तिथेच रेहानचा जन्म झाला. त्याच्याही वडिलांची इच्छा होती की तो क्रिकेटर बनावा, रेहान आज इंग्लंडच्या टीममध्ये खेळत आहे. तो एक ऑलराउंडर असून तो लेगब्रेक गुगली गोलंदाजी करतो. तर साकीब महमूद हा डाव्या हाताचा फास्टर गोलंदाज आहे. हे तीनही खेळाडू आज इंग्लंडसाठी खेळत आहेत.