
भारतीय क्रिकेट संघाने 2024 मध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत सनसनाटी विजय मिळवला. भारताने यासह तब्बल 17 वर्षांनंतर टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. भारताने या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले होते. या स्पर्धेचं यजमानपदाचा मान हा अमेरिका आणि वेस्टइंडिजकडे होता. या स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघ सहभागी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात एकूण आणि सलग दुसऱ्यांदा 20 संघ भिडणार आहेत. या 20 पैकी आतापर्यंत 17 संघ निश्चित झाले आहेत. तर 3 जागांसाठी एकूण 9 संघांमध्ये चुरस आहे. आतापर्यंत 17 संघांनी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं तिकीट कसं मिळवलं? तसेच उर्वरित 3 जागांसाठी कसं पात्र होता येणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. 17 संघ कोणते? टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा...