India vs Pakistan, T20 World cup 2021: पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीनकडे चाहत्याने मागितलं सामन्याचं तिकीट, आफ्रिदीची हटके रिएक्शन, पाहा VIDEO

| Updated on: Oct 22, 2021 | 7:51 PM

भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांमध्ये 24 ऑक्टोबरच्या सामन्यासाठीची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. दरम्यान युएईत असलेल्या दोन्ही देशाचे नागरिकही आतुरतेने सामन्याची वाट पाहत आहेत.

India vs Pakistan, T20 World cup 2021: पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीनकडे चाहत्याने मागितलं सामन्याचं तिकीट, आफ्रिदीची हटके रिएक्शन, पाहा VIDEO
शाहीन आफ्रिदी
Follow us on

T20 World Cup 2021: बहुचर्चित अशा टी-20 विश्वचषकासाला (T20 World Cup) अखेर सुरुवात झाली आहे.  ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार संपत आला असता भारत असलेल्या सुपर 12 गटाचे सामने शनिवार अर्थात 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यानंतर रविवारी लगेचच बहुप्रतिक्षित असा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही देशाती क्रिकेटप्रेमीही उत्सुक आहेत. दरम्यान जे चाहते सध्या सामना होत असलेल्या दुबई येथे आहेत. त्यांना हा सामना पाहण्याची मोठी इच्छा असणार यात शंका नाही. दरम्यान एका चाहत्याने तर पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheed Afridi) याला थेट सामन्याचं तिकीट मागितलं आहे. विशेष म्हणजे शाहीननेही त्यावर हटके उत्तर दिलं आहे.

शाहीनचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये  शाहीन आफ्रिदी सरावाचं साहित्य घेऊन रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीने त्याला भारत पाकिस्तान सामन्याचं तिकीट आहे का? असा प्रश्न विचारला. त्यानंतर शाहीनने मिश्किलपणे आपल्या खिशात हात घातला आणि तिकीट आहे का? असं तपासण्याचा मेजशीर प्रयत्न केला. हा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरुन चाहते आणि खेळाडू अशा सर्वांमध्ये या सामन्याची किती उत्सुकता आहे. हे दिसून येत आहे.

शाहीनचं आहे पाकिस्तानचा हुकुमी एक्का

शाहीन हा भारतीय फलंदाजीसाठी मोठा धोका असण्यामागील कारण म्हणजे तो एक डावखुरा गोलंदाज आहे. दरम्यान भारताची टॉप ऑर्डर डावखुऱ्या गोलंदाजासमोर लगेचच गुडघे टेकते. मग तो रोहित शर्मा असो किंवा विराट कोहली. विशेष म्हणजे रोहित शर्मा 3-4 नाही तर 13 वेळा डावखुऱ्या गोलंदाजासमोर बाद झाला आहे. तर विराट आणि सूर्यकुमार हेही शाहीनसारख्या वेगवान गोलंदाजासमोर बाद होण्याची खूप शक्यता आहे. कारण विराट 9 आणि सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये 10 वेळा वेगवान गोलंदाजासमोर तंबूत परतला आहे. भारताला पाकविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनेच विराट-रोहितसारखे मोठे विकेट मिळवले होते.

हे ही वाचा-

India vs Pakistan, T20 World cup 2021: भारतीय संघासमोर कायम पाकिस्तानने गुडघे टेकले, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

पाकिस्तानला तर आपला विराट एकटाच पुरुन उरतो, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील आकडेवारी पाहाच!

(Fan Askes for india vs pakistan match ticket to shaheen afridi his funny reaction video went viral)