Video : आवेशची वेगवान गोलंदाजी, बटलरची उडाली दांडी, पाहा Highlights Video

पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आवेशने बटलरला बोल्ड केलं. बटलर सहा चेंडूत केवळ दोन धावा करू शकला.

Video : आवेशची वेगवान गोलंदाजी, बटलरची उडाली दांडी, पाहा Highlights Video
आवेशची वेगवान गोलंदाजी
Image Credit source: twitter
| Updated on: May 15, 2022 | 10:28 PM

मुंबई : राजस्थान रॉयल्सने (RR) आयपीएलच्या (IPL 2022) च्या 63 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करत आहेत. दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. राजस्थानने दोन बदल केले आहेत. रॅसी व्हॅन डर डुसेनसाठी जिमी नीशम, तर कुलदीप सेनच्या जागी ओबेद मॅकॉयला संधी देण्यात आली आहे. लखनौच्या संघात रवी बिश्नोईचे पुनरागमन झाले आहे. करण शर्माला बाहेरचा रस्ता दाखवला. लखनौचे 12 सामन्यांतून 16 गुण झाले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. या सामन्यातील विजय लखनौला प्लेऑफमध्ये घेऊन जाईल, तर पराभव झाल्यास त्यांना शेवटचा सामना पुन्हा जिंकावा लागेल. रॉयल्सच्या संघानेही विजयाची नोंद केली, तर ते अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकतील.

आवेशची वेगवान गोलंदाजी

आवेशने बळीचा बकरा बनवताना त्रिफळा उडवला. राजस्थानचा स्फोटक सलामीवीर जोस बटलरलाही या सामन्यात काही आश्चर्यकारक करता आले नाही आणि तो स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आवेशने बटलरला बोल्ड केलं. बटलर सहा चेंडूत केवळ दोन धावा करू शकला. यावेळी आवेशच्या चांगलीच चर्चा रंगली.

आवेशची जोरदार गोलंदाजी, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जिमी नीशम, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल आणि ओबेद मॅककॉय

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, आवेश खान, दुष्मंता चमीरा, मोहसिन खान, रवी बिश्नोई

सामना पुन्हा जिंकावा लागेल

लखनौच्या संघात रवी बिश्नोईचे पुनरागमन झाले आहे. करण शर्माला बाहेरचा रस्ता दाखवला. लखनौचे 12 सामन्यांतून 16 गुण झाले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. या सामन्यातील विजय लखनौला प्लेऑफमध्ये घेऊन जाईल, तर पराभव झाल्यास त्यांना शेवटचा सामना पुन्हा जिंकावा लागेल.