
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एखाद्या दुबळ्या संघाने बलाढ्य संघाला पराभूत केलं तर गुणतालिकेवर त्याचा थेट परिणाम होतो. आतापर्यंत त्याची प्रचिती क्रीडाप्रेमींना आली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड प्रबळ दावेदार मानले जातात. पण कधी कधी दुबळे संघ स्पर्धेचं चित्र पालटून टाकतात. (फोटो- Asian Cricket)

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत पहिल्यांदा पदार्पण करणाऱ्या अमेरिकन संघाने कमाल केली होती. या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. अमेरिकेने 18 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानला फक्त 13 धावा करता आल्या. (Photo- PTI)

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील दुसरा मोठा उलटफेर म्हणजे अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. अफगाणिस्तानने 148 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 127 धावांवरच बाद झाला. यामुळे ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून आऊट झाली. (Photo- Afghanistan Cricket X)

टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये असंच चित्र पाहायला मिळालं होतं. झिम्बाब्वेने पाकिस्तानला फक्त एका धावेने नमवलं होतं. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 130 धावा केल्या. पण पाकिस्तानला 20 षटकात 129 धावा करता आल्या. हा पाकिस्तान सहज जिंकेल असं वाटत होतं. पण 1 धाव महागात पडली. (Photo- Zimbabwe Cricket X)

नामिबिया तसा दुबळा संघ, पण त्यांनी 2022 मध्ये उलटफेर करत आश्चर्याचा धक्का दिला होता. नामिबियाने बलाढ्य श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली होती. नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना 163 धावा केल्या. पण श्रीलंकाचा डाव फक्त 108 धावांवर आटोपला. नामिबियाने या सामन्यात 55 धावांनी विजय मिळवला. (Photo- ICC X)

टी20 वर्ल्डकप 2009 स्पर्धेत नेदरलँडने अशीच कमाल केली आहे. इंग्लंडचा गणित साखळी फेरीत बिघडवलं होतं. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमवून 162 धावा केल्या. पण नेदरलँडने शेवटच्या चेंडूवर विजयी पताका फडकावली. इंग्लंडला 4 विकेटने मात दिली. (Photo- X)