Arun lal marriage: 66 वर्षाच्या भारताच्या माजी क्रिकेटपटूचं 38 वर्षाच्या मुलीबरोबर दुसरं लग्न

| Updated on: May 02, 2022 | 6:32 PM

Arun lal marriage: अरुण लाल यांनी रीनाशी पहिले लग्न केले होते. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. पहिल्या पत्नी रीना या दीर्घकाळापासून आजारी आहेत.

Arun lal marriage: 66 वर्षाच्या भारताच्या माजी क्रिकेटपटूचं 38 वर्षाच्या मुलीबरोबर दुसरं लग्न
Arun lal-bulbul saha
Image Credit source: Facebook
Follow us on

कोलकाता: भारताचे माजी क्रिकेटपटू (India former cricketer) आणि बंगलाच्या रणजी संघाचे विद्यमान कोच अरुण लाल (Arun lal second marriage) आज सोमवारी विवाहबंधनात अडकले. त्यांचा हा दुसरा विवाह आहे. 66 वर्षाच्या अरुण लाल यांनी त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान असलेल्या कोलकाताच्या बुलबुल साहा (Bulbul saha) बरोबर लग्न केलं. पहिल्या पत्नीच्या समतीने त्यांनी दुसर लग्न केलं आहे. अरुण आणि बुलबुल बऱ्याचकाळापासून एकमेकांना ओळखत होते. मागच्या महिन्यातच दोघांचा साखरपुडा झाला होता. अरुण लाल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 16 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांच्या खात्यात 729 धावा आहेत. 13 एकदिवसीय सामन्यात 122 धावा केल्या आहेत. अरुण लाल यांनी 1982 मध्ये भारतासाठी डेब्यु केला. 1989 साली ते भारतासाठी शेवटचा सामना खेळले. 38 वर्षांची बुलबुल पेशाने टीचर आहे. कोलकाता येथील एका खासगी शाळेत ती शिकवते.

पहिल्या पत्नीच्या इच्छेने दुसर लग्न

अरुण लाल यांनी रीनाशी पहिले लग्न केले होते. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. पहिल्या पत्नी रीना या दीर्घकाळापासून आजारी आहेत. अरुण लाल यांचे पहिल्या पत्नीच्या इच्छेनेच दुसऱ्यांदा लग्न झालं आहे.

कर्करोगावर मात करून बंगाल संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले

अरुण यांचा जन्म 1 ऑगस्ट 1955 रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. ते बंगालकडून क्रिकेट खेळले आहेत. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे अधिकारी, सहकारी क्रिकेटपटू, बंगालचे क्रिकेटपटू आणि इतर कुटुंबातील सदस्यांनाही त्यांच्या लग्नाला आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये अरुण लाल यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांनी कॉमेंट्री सोडली. त्यानंतर आजाराला हरवून त्यांनी बंगाल संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

कारकिर्दीत 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने

अरुण लाल यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. अरुण लाल यांना त्यांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आले नाही. त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये 156 सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी 30 शतके झळकावत एकूण 10421 धावा केल्या. अरुण लाल यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना 27 जानेवारी 1982 रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला. तर शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध एप्रिल 1989 मध्ये किंग्स्टन कसोटीत खेळला गेला होता.