
नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने टीम इंडिया आणि कोलकाता नाइट रायडर्सचा ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरबद्दल मोठं वक्तव्य केलय. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस भारतीय क्रिकेटप्रेमींच्या भावना दुखावतील असं बोललाय. स्कॉट स्टायरिस शार्दुल ठाकूरला ऑलराऊंडर मानत नाही. त्याने शार्दुलला ऑलराऊंडर मानायलाच नकार दिला आहे. शार्दुलने अनेक सामन्यात आपल्या बॅटची कमाल दाखवलीय.
त्याने आपल्या बॅटिंगच्या बळावर टीम इंडियाला विजय मिळवून दिलाय. असं असूनही स्कॉट स्टायरिसने शार्दुलबद्दल असं विधान केलय. आयपीएल 2023 मध्ये शार्दुलने फक्त 20 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली होती. शार्दुल ठाकूर भारतासाठी अनेक महत्वाच्या इनिंग खेळलाय.
शार्दुलची आयपीएल 2023 मध्ये कामगिरी कशी आहे?
शार्दुल ठाकूरकडे टीम इंडियाचा हार्दिक पंड्याचा पर्याय म्हणून पाहिलं जातं. भारताच्या कसोटी संघाचा तो भाग आहे. स्कॉट स्टायरिसच्या मते हार्दिक पंड्या शार्दुल ठाकूरपेक्षा जास्त प्रतिभावान आहे. स्टायरिसने त्यामागच कारणही सांगितलं. हार्दिक पंड्या प्रॉपर ऑलराऊंडर आहे, पण ठाकूरच तसं नाहीय. शार्दुल ठाकूर आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 10 सामने खेळलाय. त्याने पाच विकेट घेतलेत. 110 धावा केल्यात. ठाकूरची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीममध्ये निवड झालीय.
ठाकूरला संघर्ष करावा लागेल असं का म्हणतो?
टीम इंडियात आपलं स्थान पक्क करण्यासाठी शार्दुल ठाकूरसमोर हार्दिक पंड्याच आव्हान असणार आहे, असं स्कॉट स्टायरिसला वाटतं. ठाकूरकडे बाऊंड्री मारण्याची क्षमता आहे, हे स्टायरिसरने मान्य केलं. ठाकूर टेस्टमध्ये भारतासाठी काही विजयी इनिंग खेळलाय हे सुद्धा त्याने सांगितलं. त्याच्यामध्ये प्रतिभा आहे. पण हार्दिकच्या उदयाने ठाकूरच्या अडचणी वाढल्या आहेत. स्टायरिस स्पोर्ट्स 18 बरोबर बोलताना हे म्हणाला.
‘शार्दुल ठाकूर हार्दिक पंड्या इतका सक्षम नाहीय’
स्कॉट स्टॉयरिस म्हणाला की, “हार्दिक पंड्या प्रॉपर ऑलराऊंडर आहे. टीममध्ये एकाच प्रकारचे दोन खेळाडू असतील का?” असा प्रश्न त्याने उपस्थित केला. शार्दुल ठाकूर हार्दिक पंड्या इतका सक्षम नाहीय. त्याने ठाकूरला ऑलराऊंडर म्हणून मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. ठाकूर बॅकअप म्हणून खेळू शकतो असं स्टायरिसच मत आहे.
कॅमबॅक असं की, डायरेक्ट कॅप्टन
हार्दिक पंड्या 2022 आधी दोन वर्ष दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे त्याचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु होता. तो गोलंदाजी करु शकत नव्हता. हार्दिक पंड्याच्या पर्यायचा शोध सुरु झाला होता. वेंकटेश अय्यर, ठाकूर, दीपक चाहर यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिलं जात होतं. पंड्याने 2022 मध्ये जोरदार कमबॅक केलं. आता त्याच्याकडे थेट टी 20 टीमच नेतृत्व आहे.