AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीर प्रशिक्षक होताच चार खेळाडूंना दाखवला जाणार बाहेरचा रस्ता?

भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच तो हेड कोच म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. गौतम गंभीर यांने बीसीसीआय समोर ठेवलेली मोठी अट देखील बीसीसीआयने मान्य केली आहे. त्यामुळे तो हेडकोच होताच काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

गौतम गंभीर प्रशिक्षक होताच चार खेळाडूंना दाखवला जाणार बाहेरचा रस्ता?
| Updated on: Jun 17, 2024 | 8:29 PM
Share

कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर लवकरच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार आहेत. याबाबत महिन्याच्या शेवटी बीसीसीआयकडून मोठी घोषणा केली जाऊ शकते. सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. २०२४ च्या T-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी नव्या प्रशिक्षकावर येणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता जास्त आहे. पण त्याआधी त्याने एक मोठी अट ठेवली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी गौतम गंभीरने घातलेली अट बीसीसीआयने मान्य केली आहे. त्यामुळे गौतम गंभीर प्रशिक्षक बनताच टीम इंडियामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

बीसीसीआयने एक मोठी अट मान्य केली

रिपोर्टनुसार, बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यात एक करार झाला आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पारस महांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी. दिलीप यांचा समावेश होता. आता गौतम गंभीर प्रशिक्षण झाल्यानंतर या सगळ्यांना देखील हटवले जाऊ शकते. त्यामुळे गंभीर स्वतः सपोर्ट स्टाफची निवड करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गौतम गंभीरकडून आयसीसी ट्रॉफीची अपेक्षा

गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सला मेंटर म्हणून आयपीएल 2024 चा चॅम्पियन बनवले आहे. गौतम गंभीरने आता फूल टाईम क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्याने खासदारकी न लढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे. प्रशिक्षण होण्याआधी केकेआरचा कर्णधार असताना गौतम गंभीरने दोनदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन बनला होता.

संघातून चार खेळाडू काढणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनताच भारतीय संघातून चार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. हे चार खेळाडू कोण असतील याचा खुलासा अद्याप झालेला नाही. गंभीर आजपर्यंत कोणत्याही संघाचा मुख्य प्रशिक्षक बनलेला नाही. आयपीएलमध्ये तो लखनऊ आणि केकेआरचा मेंटर होता. अशा स्थितीत गंभीर प्रथमच मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.