AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्राहकांसाठी आनंदवार्ता; इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी क्रेडिट कार्ड बाजारात, फायदाच फायदा होणार

IndusInd Bank Jio BP Mobility Credit Card: ग्राहकांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. इंडसइंड बँकेचे पहिले इंधन-केंद्रित क्रेडिट कार्ड आणि जिओ-बीपीचे पहिले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड बाजारात आले असून ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

ग्राहकांसाठी आनंदवार्ता; इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी क्रेडिट कार्ड बाजारात, फायदाच फायदा होणार
क्रेडिट कार्डImage Credit source: गुगल
| Updated on: Dec 18, 2025 | 1:28 PM
Share

IndusInd Bank Jio BP Mobility Credit Card: ग्राहकांच्या आनंदात भर घालणारी बातमी आली आहे. इंडसइंड बँक आणि जिओ-बीपी यांनी ‘इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+ क्रेडिट कार्ड’ बाजारात दाखल झाले आहे. या अनोख्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डमुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. इंधन भरताना आणि युपीआय पेमेंट करताना ग्राहकांना इंधन लाभांसोबतच विशेष लाइफस्टाइल रिवॉर्ड्स मिळतील. त्यामुळे त्यांचा फायदाच फायदा होईल.

फिरस्त्यांसाठी तर पर्वणीच

इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+ क्रेडिट कार्ड हे रुपे नेटवर्कवर आधारित नवीन मोबिलिटी+ क्रेडिट कार्ड आहे. जिओ-बीपीच्या 2050+ मोबिलिटी स्टेशन्सच्या विस्तृत नेटवर्कवर जलद गतीने रिवॉर्ड्स, विशेष लाइफस्टाइल सुविधा आणि UPI-सक्षम सोयीसुविधांचे एकत्रित फायदा ग्राहकांना मिळेल. सतत फिरस्तीवर असणाऱ्या, प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी हे कार्ड एक पर्वणीच असेल.

इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+ क्रेडिट कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये

जिओ-बीपी पेट्रोल पंप, कन्क्विनियन्स स्टोअर्स आणि वाइल्डबीन कॅफे आउटलेट्सवर प्रत्येक 100 रुपयांच्या खर्चावर 12 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

डायनिंग, सुपरमार्केट्स आणि किराणा खर्चावर प्रत्येक 100 रुपयांमागे 5 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+ क्रेडिट कार्ड निवडक जिओ-बीपी आउटलेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे उपलब्ध आहे.

ग्राहक जलद डिजिटल ऑनबोर्डिंगचा लाभ घेऊन पहिल्या दिवसापासून रिवॉर्ड्स कमवू शकतात.

लागलीच 400 बोनस रिवॉर्ड पॉइंट्स

बँकेच्या प्रणालीत कार्ड सेटअप झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत जिओ-बीपी आउटलेटवर पहिल्या इंधन व्यवहारावर 400 बोनस रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. तसेच पहिल्या वाइल्डबीन कॅफे व्यवहारावर मोफत वाइल्डबीन कॅफे कूपन मिळेल. जिओ-बीपी इकोसिस्टममध्ये दरमहा 4,000 रुपयांच्या खर्चावर 200 बोनस रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. वार्षिक 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च करणाऱ्या कार्डधारकांना 4,000 पर्यंत बोनस रिवॉर्ड पॉइंट्सचे माइलस्टोन गाठता येईल.

डिजिटल पेमेंटची मोठी सोय

रुपे नेटवर्कवर असल्यामुळे, UPI-आधारित क्रेडिट कार्डवरून सुरक्षित आणि सहज व्यवहार करता येईल. रिवॉर्ड पॉइंट्स जिओ-बीपी मोबिलिटी स्टेशन्स, कन्क्विनियन्स स्टोअर्स आणि वाइल्डबीन कॅफे आउटलेट्सवर रिडीम करता येईल. ग्राहकांना बोनस आणि रिवॉर्ड पॉईंट्सचा दुहेरी फायदा घेता येईल.

ग्राहकांसाठी अधिक स्मार्ट पर्याय

“जिओ-बीपीसोबत भागीदारी करून इंडसइंड बँक जिओ-बीपी मोबिलिटी+ क्रेडिट कार्ड सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. हे उत्पादन नाविन्य आणि ग्राहक-केंद्रिततेप्रती आमच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे. इंडसइंड बँकेचे आर्थिक कौशल्य आणि जिओ-बीपीचे विस्तृत नेटवर्क एकत्र येऊन व्यवहारांच्या पलीकडे जाणारे, ग्राहकांना अधिक स्मार्ट आणि अधिक फायदेशीर मोबिलिटी अनुभव देणारे भविष्याभिमुख समाधान निर्माण करते. आजच्या गतिमान ग्राहकांसाठी अपूर्व मूल्य देणारी नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स घडवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.” असे इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व CEO राजीव आनंद उद्घाटनप्रसंगी म्हणाले.

ग्राहकांना नवीन मोबिलिटीचा चांगला अनुभव

“जिओ-बीपीमध्ये आमची रणनीती नाविन्य आणि प्रत्येक ग्राहकाच्या मोबिलिटी अनुभवात सुधारणा करण्यावर आधारित आहे. ही भागीदारी डिजिटल सोल्यूशन्स आणि दैनंदिन उपयोगी मूल्य यांचे एकत्रीकरण करण्याच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे. इंधन व संबंधित सेवांपर्यंत ग्राहकांचा प्रवेश अधिक सुलभ करून, सोय, रिवॉर्ड्स आणि डिजिटल अनुभवांमध्ये नवे मानदंड प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.” असे जिओ-बीपीचे चेअरमन सार्थक बेहुरिया म्हणाले.

वर्षाला 60 लिटरपर्यंत मोफत इंधन मिळू शकते

“या सहकार्याद्वारे आम्ही आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी त्यांच्या मोबिलिटी गरजांसाठी अर्थपूर्ण रिवॉर्ड्स देणारे आणखी एक आकर्षक मूल्य प्रस्ताव सादर करत आहोत. ग्राहकांना वर्षाला 60 लिटरपर्यंत मोफत इंधन मिळू शकते आणि जिओ-बीपीवर प्रत्येक इंधन भरण्यावर 4.25% पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. UPI-सक्षम व्यवहार आणि ACTIVE टेक्नॉलॉजी इंधनांसह हे फायदे, आमच्या ग्राहकांसाठी परिवर्तनकारी आणि भविष्यकालीन मोबिलिटी सोल्यूशन्स देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतात.” असे जिओ-बीपीचे CEO अक्षय वाधवा यांनी सांगितले.

इंडसइंड बँक विषयी

इंडसइंड बँक लिमिटेड गेल्या 31 वर्षांपासून बँकिंग क्षेत्रात नव्याने परिभाषा घडवत असून, प्रगती आणि नाविन्याचा अग्रदूत राहिली आहे. सरकारी संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, किरकोळ ग्राहक आणि मोठ्या कॉर्पोरेट्स यांसह विविध भागधारकांसाठी उन्नत बँकिंग अनुभव देण्यावर बँकेचा भर आहे. मायक्रोफायनान्स, वैयक्तिक कर्जे, डेबिट/क्रेडिट कार्ड्स, SME कर्जे, प्रगत डिजिटल बँकिंग सुविधा, श्रीमंत व NRI बँकिंग सेवा, वाहन वित्तपुरवठा आणि ESG-संलग्न नाविन्यपूर्ण आर्थिक उत्पादने ही बँकेची प्रमुख उत्पादने आहेत. दुबई आणि अबू धाबी येथील प्रतिनिधी कार्यालयांद्वारे वाढत्या भारतीय डायस्पोरालाही बँक सेवा पुरवते. 30 सप्टेंबर 2025 रोजी, इंडसइंड बँक 3,116 शाखा/बँकिंग आउटलेट्स आणि 3,054 ATMद्वारे सुमारे 4.2 कोटी ग्राहकांना सेवा देत असून, भारतातील 1,64,000 लाख गावांपर्यंत पोहोचली आहे. ‘डिजिटल 2.0’ धोरणाअंतर्गत बहु-चॅनेल सेवा आणि मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा बँक सुनिश्चित करते. ‘INDIE’सारख्या अनोख्या ऑफरिंग्समध्ये नाविन्य आणि ग्राहक-केंद्रितता हे केंद्रस्थानी आहेत. इंडसइंड बँक BSE आणि NSE साठी क्लिअरिंग बँक, NCDEX साठी सेटलमेंट बँक आणि MCX साठी पॅनल बँकर आहे.

जिओ-बीपी विषयी

‘जिओ-बीपी’ या ब्रँडअंतर्गत कार्यरत रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड (RBML) ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि bp यांच्यातील भारतीय इंधन व मोबिलिटी संयुक्त उद्यम आहे. रिलायन्सचा देशव्यापी विस्तार आणि जिओ डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यवधी ग्राहकांचा लाभ, तर bp चे उच्च दर्जाचे इंधन, ल्युब्रिकंट्स, रिटेल आणि प्रगत लो-कार्बन मोबिलिटी सोल्यूशन्समधील जागतिक अनुभव या संयुक्त उद्यमाला मिळतो. पारंपरिक इंधनांसोबतच जिओ-बीपी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग, कंप्रेस्ड बायोगॅस (CBG) यांसारखी पर्यायी इंधन व प्रगत मोबिलिटी सोल्यूशन्स देते. ‘एअर बीपी-जिओ’ हा ब्रँड भारतातील आघाडीचा एव्हिएशन टर्बाइन फ्युएल पुरवठादार आहे. ‘जिओ-बीपी फ्युएल4यू’ ही सेवा मागणीनुसार डिझेलच्या घरपोच वितरणासाठी ओळखली जाते आणि या क्षेत्रात बाजारातील आघाडीवर आहे. तसेच जिओ-बीपी ही bp च्या लोकप्रिय यूके फ्युएल फोरकोर्ट कॅफे ब्रँड ‘वाइल्डबीन कॅफे (WBC)’ ची भारतातील भागीदार असून, फोरकोर्टच्या बाहेरही WBC उपलब्ध करून देण्यात नाविन्य केले आहे.

नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.