वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्काराचा इतिहास जुनाच, या संघांनीही उचललं होतं पाऊल; कसं काय ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघ आयसीसीच्या रडारवर आला आहे. पण वर्ल्डकप स्पर्धेत बहिष्कार टाकण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वी चार संघांनी असं केलं आहे.

वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्काराचा इतिहास जुनाच, या संघांनीही उचललं होतं पाऊल; कसं काय ते समजून घ्या
वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्काराचा इतिहास जुनाच, या संघांनीही उचललं होतं पाऊल; कसं काय ते समजून घ्या
Image Credit source: Getty Images
| Updated on: Feb 02, 2026 | 7:15 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तानची नाटकं सुरू झाली आहे. आता त्याने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याचा नवा अंक सुरू केला आहे. या निर्णयावरून कधीही माघार घेऊ शकतात. हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. पण त्याआधीच बहिष्कार टाकल्याची घोषणा केल्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. आता पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहते की नाही हे आताच सांगणं कठीण आहे. त्यामुळे आयीसी पाकिस्तानवर कारवाई करण्याची शक्यता आहे. असं करणं खरंच आयसीसीला शक्य आहे का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. पण पाकिस्तान वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यावर बहिष्कार टाकणारा पहिला संघ नाही. यापूर्वी चार संघांनी अशी कृती केली आहे. त्यांना आयसीसीने काय शिक्षा दिली ते समजून घेऊयात.

आयसीसी स्पर्धांचा इतिहास 50 वर्षे जुना आहे. 1975 मध्ये पहिला पुरूष वर्ल्डकप स्पर्धा पार पडली होती. तेव्हापासून आतापर्यंत बहिष्काराचे काही प्रकरणं घडली आहेत. यापूर्वी दोन वेगवेगळ्या वर्ल्डकप स्पर्धेतील 4 सामन्यात बहिष्कार टाकला गेला आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला हे काय नवीन नाही.

सर्वात पहिल्यांदा 1996 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत असा प्रकार घडला होता. तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने श्रीलंकेतील सामन्यावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी एलटीटीईचा श्रीलंकेत प्रभाव होता. तेसच वर्ल्डकपच्या एक महिन्याआधी या दहशतवादी संघटनेने बँकेत स्फोट घडवला होता. यात 91 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने सुरक्षेचं कारण देत बहिष्कार टाकला होता. आयसीसीने या संघांवर कारवाई केली नाही. उलट दोन्ही संघांना प्रत्येकी 2 गुण गमवावे लागले होते. त्यामुळे श्रीलंकेला फायदा झाला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून श्रीलंकेने जेतेपदावर नाव कोरलं होतं.

2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत असंच घडलं. तेव्हा इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी आपल्या सामन्यांवर बहिष्कार टाकला होता. इंग्लंडने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना राजकीय कारणामुळे खेळला नव्हता. सुरक्षेचं कारण देत सामना खेळण्यास नकार दिला. तर न्यूझीलंडनेही सुरक्षेचं कारण पुढे करत केनियाविरुद्ध सामना खेळला नाही. त्यामुळे झिम्बाब्वे आणि केनियाला यांना प्रत्येकी 2 गुण मिळाले होते.

मागच्या इतिहास पाहता पाकिस्तानवर काही कारवाई होणार नाही. पण पाकिस्तानने सामने श्रीलंकेत आयोजित व्हावेत यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयसोबत करार केला होता. आता करार मोडत असल्याने पाकिस्तान संघ अडचणीत येऊ शकतो.