
आयपीएल 2024 स्पर्धेतील जेतेपदासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सुरुवात हवी तशी झाली नाही. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले त्यामुळे हैदराबादचा संघ बॅकफूटवर गेला. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड झटपट बाद झाले. मिचेल स्टार्कची धास्ती हैदराबादच्या फलंदाजांनी घेतल्याचं स्पष्ट दिसून आलं. हेडने तर नॉन स्ट्राईकला राहणं पसंत केलं. इतकं सर्व व्यवस्थित होत असताना कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरची एक क्षण धाकधूक वाढली. श्रेयस अय्यरने संघाचं पाचवं आणि वैयक्तिक तिसरं षटक मिचेल स्टार्कला सोपवलं. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण बॅटला कट लागल्याने चेंडू खूपच वर चढला. एवढ्या वर चढलेला चेंडू झेल होईल की नाही अशी शंका प्रत्येकाच्या मनात होती. यातून गौतम गंभीरही सुटला नाही. कारण चेंडू जज करत त्याच्या रमणदीप सिंग आला होता. आात झेल पकडणार की नाही अशी चलबिचल सुरु होती. हा क्षण डोळ्यात साठवणं गौतम गंभीरलाही कठीण गेलं. त्याने तर हातात असलेल्या नॅपकिनने चेहरा झाकला.
रमणदीप सिंगने झेल पकडल्यानंतर शेजारी असलेल्या खेळाडूने गंभीरला सांगितलं. यानंतर गंभीरने जोशात त्याच्या हातावर टाळी दिली. पण चेंडू वर चढल्यानंतर खाली हातात झेल घेईपर्यंतचा क्षण धाकधूक वाढवणारा होता. मिचेल स्टार्कने तीन षटकं दोन विकेट घेतले. मिचेल स्टार्कला घेणं किती महत्त्वाचं होतं हे गौतम गंभीरने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. पहिल्या काही सामन्यात फेल गेल्यानंतर टीका झाली होती. पण महत्त्वाच्या सामन्यात अनुभव किती महत्त्वाचा असतो हे दिसून आलं.
Mitchell Starc on fire .🔥
Rahul tripathi played no look short but out.
KKR VS SRH
📸: jio cinema #IPLFINAL#KKRvsSRH#SRHvsKKR pic.twitter.com/FqmFVF51BV— Stump & Bowled (@stumpNdBowled) May 26, 2024
Gautam gambhir reaction before and after catch of Rahul Tripathi !! pic.twitter.com/ESPlN6Pwdc
— Indian (@Indianiqq) May 26, 2024
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
कोलकाता नाईट रायडर्स इम्पॅक्ट प्लेयर्स: अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर्स: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर