Video : अरेरेरे काय करतोय! लखनौच्या विजयानंतर गंभीरची खतरनाक रिअ‍ॅक्शन, व्हिडीओ व्हायरल

Video : अरेरेरे काय करतोय! लखनौच्या विजयानंतर गंभीरची खतरनाक रिअ‍ॅक्शन, व्हिडीओ व्हायरल
गौतम गंभीर

गौतमला आपण फक्त त्याच्या गंभीर शैलीसाठी ओळखतो. पण, काल त्याची वेगळीच रिअ‍ॅक्शन पहिल्यांदाच पाहिली.

शुभम कुलकर्णी

|

May 19, 2022 | 7:07 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये बुधवारी केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सला रोमहर्षक सामन्यात दोन धावांनी पराभूत करून प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. रिंकू सिंहमुळे (Rinku Singh) केकेआरचा संघ सामना जिंकण्याच्या स्थितीमध्ये पोहोचला होता. 17 व्या षटकात केकेआरची धावसंख्या 150 असताना आंद्रे रसेल आऊट झाला. सर्वांना वाटलं सामना लवकर संपणार. पण रिंकू सिंहने सामन्यात जान आणली. त्याने तुफान खेळ दाखवला. शेवटच्या 20 ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर लुईसच्या अविश्वसनीय झेलमुळे लखनौला सामना जिंकता आला. हा सामना संपल्यानंतर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) खूप आनंदी आणि उत्साही दिसत होता. गंभीरच्या या रिअ‍ॅक्शन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

अरेरेरे काय झालं!

मोठी धावसंख्या उभारली

क्विंटन डी कॉकचे शतक आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौनं प्रथम फलंदाजी करताना 210 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. केकेआरचा संघ 20 षटकांत केवळ 208 धावा करू शकला.

अप्रतिम झेल

211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या षटकात 21 धावांची गरज होती. केएल राहुलने मार्कस स्टॉइनिसच्या हातात चेंडू टाकला आणि रिंकू सिंगने पहिल्या चेंडूवर चौकार मारून पुढच्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचून सामना केकेआरकडे वळवला. आता कोलकाताला शेवटच्या तीन चेंडूत 5 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर रिंकू सिंगने दोन धावा घेतल्या. मात्र पुढच्या चेंडूवर तो 40 धावांची तुफानी खेळी खेळून बाद झाला. एव्हॉन लुईसने रिंकूला पॅव्हेलियनच्या वाटेवर अप्रतिम झेल दाखवला. आता केकेआरला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती आणि उमेश यादव क्रीजवर होता. स्टॉइनिसने उमेशला शानदार यॉर्करवर बोल्ड केले आणि हरलेली बाजी जिंकली

गौतम गंभीरची रिअ‍ॅक्शन

या रोमांचक सामन्यानंतर डगआऊटमध्ये बसलेला गौतम गंभीर खूप आनंदी दिसत होता. यादरम्यान, तो मोठ्या उत्साहाने सहकारी खेळाडूंना मिठी मारताना दिसला. गौतमला आपण फक्त त्याच्या गंभीर शैलीसाठी ओळखतो, अशा परिस्थितीत चाहत्यांनी त्याची ही रिअ‍ॅक्शन पहिल्यांदाच पाहिली असेल.

हे सुद्धा वाचा

प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ

लखनौ सुपर जायंट्स हा या विजयासह प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे, तर श्रेयस अय्यरचा आयपीएल 2022 मधील कोलकाता नाइट रायडर्सचा प्रवास या पराभवाने संपला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें