
भारत आणि वेस्ट इंडिजमधील (India v West Indies) पहिल्या टी -20 (T20 Match) सामन्यामध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू रेस्टन चेसने (Reston Chase) त्याच्या तळहातावर एक पट्टी बांधली होती. या पट्टीवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी अक्षेप घेतला आहे. क्षेत्ररक्षण करताना दुखापत टाळण्यासाठी खेळाडूंना बोटावर टेप लावण्याची परवानगी आहे. मात्र चेसने त्यांच्या संपूर्ण तळहातालाच काळी पट्टी गुंडाळली होती. याला परवानगी आहे का असा सवाल सुनिल गावस्कर यांनी उपस्थित केला आहे. रेस्टन चेसने भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या टी -20 सामन्यामध्ये आपल्या तळहाताला काळी पट्टी लावली होती. यावर सुनिल गावसकर यांनी जोरदार अक्षेप घेतला आहे. माझ्या माहितीप्रमाणे खेळाडू क्षेत्ररक्षणादरम्यान होणारी दुखापत टाळण्यासाठी अशा पद्धतीची काळी टेप किंवा एखादी वस्तू आपल्या बोटाला लावतात मात्र त्याने संपूर्ण तळहातालाच पट्टी लावल्याचे गावस्कर यांनी म्हटले आहे.
सामन्याचे सूत्रसंचालन करताना गावस्कर यांनी म्हटले की, रेस्टन चेसने त्याच्या संपूर्ण तळहातावर काळ्या कलरची पट्टी घातली आहे. क्षेत्ररक्षण करताना हाताच्या बोटाला इजा होऊ नये म्हणून खेळाडू आपल्या बोटाला या पद्धतीने संरक्षक पट्टी लावत असतात. मात्र त्यांने आपल्या संपूर्ण तळहातावर या पद्धतीची पट्टी लावली आहे. हे योग्य आहे का, असे केल्याने क्षेत्ररक्षकाला अधिक मदत मिळते असा अक्षेप गावस्कर यांनी केला आहे.
विशेष म्हणजे भारताविरूद्ध खेळल्या गेलेल्या या पहिल्या टी – 20 सामन्यामध्ये रेस्टन चेसने संपूर्ण क्षेत्ररक्षणाच्या काळामध्ये आपल्या तळहाताला ही काळी पट्टी लावलेली होती. चेसने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 14 धावा देऊन 2 विकेट घेतल्या तरी देखील भारताने हा सामना सहा गड्यांनी जिंकला.
Video | धनंजय मुंडेंचा स्क्वेअर कट पाहिलात का? सरपंच प्रीमिअर लीगमध्ये कुटल्या 7 चेंडूत 11 धावा
IND vs SL: टीम इंडियात वारंवार निवड होऊनही संधी मिळत नसलेल्या चेहऱ्यांबद्दल जाणून घ्या…