AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाईम आऊट, ऑब्स्ट्रॅक्टिंग द बॉलनंतर आता नवा पेच, तुम्हीच सांगा आऊट की नाही ते

क्रिकेटमध्ये काळानुरूप बरेच बदल पाहायला मिळत आहेत. पण काही नियम पाहता आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहाणार नाही. क्रिकेट टाईम आऊटनंतर ऑब्स्ट्रॅक्टिंग द बॉलसारख्या घडामोडी २०२३ या वर्षात पाहायला मिळाल्या. आता यात आणखी एका वादाची भर पडली आहे. त्यामुळे फलंदाज आऊट की नाही ते तुम्हीच ठरवा.

टाईम आऊट, ऑब्स्ट्रॅक्टिंग द बॉलनंतर आता नवा पेच, तुम्हीच सांगा आऊट की नाही ते
क्रिकेटमध्ये काय काय बघावं लागेल देव जाणे! आता त्या स्थितीवरून रंगला क्रीडाविश्वात वाद
| Updated on: Dec 11, 2023 | 2:06 PM
Share

मुंबई: वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध श्रीलंका हा सामना चर्चेत राहिला. त्याला कारण म्हणडे अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट झाल्याचं..त्यानंतर बरोबर एका महिन्यानंतर बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात ऑब्स्ट्रॅक्टिंग द बॉल विकेटची चर्चा रंगली. अशा सर्व घडलं असताना त्यात आता नव्या वादाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आलं आहे. एसीटी प्रीमियल क्रिकेटदरम्यान ही आश्चर्यकारक घटना घडली. यात फलंदाजाला क्लिन बोल्ड करूनही नाबाद देण्यात आलं. यात गोलंदाजांने नो बॉल वगैर असं काहीच टाकलं नाही. तसेच डेड बॉलचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे असं काय झालं की फलंदाजाला आऊट दिलं नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण बोल्ड होऊनही बेस्ट स्टंपवर तश्याच होत्या त्यामुळे त्याला नाबाद घोषित करण्यात आलं.

गिन्निंदरा क्रिकेट क्लब आणि वेस्ट डिस्ट्रिक्ट संघ यांच्यात सामना होता. गिन्निंदराचा वेगवान गोलंदाज अँडी रेनॉल्डसने वेस्ट डिस्ट्रिकच्या मॅथ्यू बोसस्टोला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर खेळाडूंनी मैदानात जल्लोष साजरा केला. पण झालं असं की बेल्स स्टंपवर होत्या तशाच होत्या. त्यामुळे सर्वच जण गप्प झाले. कॅनबरा टाईम्सच्या रिपोर्टनुसार फलंदाज तंबूच्या दिशेने मार्गस्थ झाला होता. जेव्हा बेल्स न पडल्याचं त्याला कळलं तेव्हा तो पुन्हा क्रिजवर आला.

पंचांमध्ये याबाबत बरीच खलबतं झाली. पण क्रिकेट नियमानुसार बोसस्टोला नाबाद घोषित करण्यात आलं. मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या २९.२२ च्या नियमानुसार, स्टम्प पडल्यानंतरही कमीत कमी एक बेल्स जमिनीवर पडणं आवश्यक आहे. किवा एकापेक्षा जास्त स्टप्स पडणं गरजेचं आहे.

वेस्ट डिस्ट्रिक्टचा कर्णधार सॅम व्हाईटमॅन याने नंतर सांगितलं की, “मी यापूर्वी कधीच असं पाहिलं नव्हतं. स्टम्प उडाल्यानंतर आम्ही सर्वत खूश झालो होतो. पण फलंदाज परत आल्याने आमच्या आनंदावर विरजण पडलं. काही वेळानंतर त्याला पुन्हा बाद केलं. त्यानंतर कुठे आम्हाला आनंद झाला.”

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.