IPl Final : महेंद्र सिंग धोनीने ‘ती’ एक गोष्ट केली अन् सीएसकेने जिंकला टॉस, पाहा नेमकं काय केलं?

सामन्यादरम्यान टॉसवेळी केलेल्या एक कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. धोनीने नेमकं काय केलं ज्याचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर जोरदार व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

IPl Final : महेंद्र सिंग धोनीने ती एक गोष्ट केली अन् सीएसकेने जिंकला टॉस, पाहा नेमकं काय केलं?
| Updated on: May 29, 2023 | 9:12 PM

मुंबई : आयपीएल 2023 फायनल सामना सुरू असून रविवारी पावसामुळे रद्द झालेल्या सोमवारी हा सामना होत आहे. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. रविवारी क्रिकेट रसिकांच्या पदरी निराशा पडली मात्र अखेर आज सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान टॉसवेळी केलेल्या एक कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. धोनीने नेमकं काय केलं ज्याचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर जोरदार व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

पाहा धोनीने नेमकं काय केलं?

 

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकली. चेन्नईने प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. धोनीने टॉस जिंकण्यासाठी खास युक्ती वापरली. उजव्या हाताचा खेळाडू असताना धोनीने डाव्या हाताने टॉस फेकला. तो सर्व काही उजव्या हाताने करतो पण आयपीएल फायनलसाठी तो डाव्या हाताने टॉस केल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

CSK vs GT Live Updates : दोन्ही संघांची प्लेइंग 11

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (W), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋुतुराज गायकवाड़, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कप्तान, विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा