
मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने आयपीएल 2025 मधील एलिमिनेटर सामन्यात इतिहास घडवला आहे. रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा एकूण दुसरा तर पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. (Photo Credit : IPL/Bcci)

रोहित शर्मा याने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 300 सिक्स पूर्ण केले आहेत. रोहित अशी कामिगिरी करणारा ख्रिस गेल याच्यानंतर पहिला फलंदाज ठरला आहे. माजी क्रिकेटर ख्रिस गेल याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 357 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : IPL/Bcci)

रोहितला षटकारांचं त्रिशतक पूर्ण करण्यासाठी 2 मोठ्या फटक्यांची गरज होती. रोहितने साई किशोर याच्या बॉलिंगवर सहाव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सिक्स ठोकला. त्यानंतर रोहितने नवव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर राशिद खानला सिक्स ठोकला. रोहितने यासह 300 सिक्स पूर्ण केले. (Photo Credit : IPL/Bcci)

रोहितने या सिक्ससह आणखी एक कारनामा केला. रोहितने आयपीएलमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण केल्या. रोहित अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला. (Photo Credit : IPL/Bcci)

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने 266 सामन्यांमध्ये 8 हजार 618 रन्स केल्या आहेत. तर रोहितने 271 व्या सामन्यात 7 हजार रन्स पूर्ण केल्या. (Photo Credit : IPL/Bcci)