
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने 20 धावांनी विजय मिळवत गुजरात टायटन्सचा स्पर्धेतून पत्ता कट केला. मुंबईने या विजयासह क्वालिफायर-2 मध्ये धडक दिली. त्यामुळे मुंबई आता आयपीएल ट्रॉफी जिंकण्यापासून 2 पाऊल दूर आहे. रोहित शर्मा याने एलिमिनेटर सामन्यात मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. रोहितने मुंबईला स्फोटक सुरुवात करुन दिली. त्यामुळे गुजरात बॅकफुटवर गेली. त्यामुळे मुंबईला या सामन्यात 228 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात गुजरातला 208 धावाच करता आल्या.
रोहित शर्मा याने गुजरात विरुद्ध 162 रन्सच्या स्ट्राईक रेटने 50 बॉलमध्ये 81 रन्स केल्या. रोहितने या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार ठोकले. रोहितला त्याच्या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. रोहितची आयपीएल इतिहासात ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याची 21 वी वेळ ठरली. रोहितने यासह त्याचा विक्रम आणखी मजबूत केला. रोहित व्यतिरिक्त विराट कोहली याने 19 तर महेंद्रसिंह धोनी याने 18 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
रोहित सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय तर एकूण तिसरा खेळाडू आहे. याबाबत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डी व्हीलियर्स (25) पहिल्या तर ख्रिस गेल (22) दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आता रोहितकडे क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध धमाकेदार खेळी करुन ख्रिस गेल याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
रोहितला या मोसमाच्या सुरुवातीला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रोहितला टीका सहन करावी लागली. रोहितला धावांसाठी संघर्ष करावा लागला. मात्र रोहितने त्याला हिटमॅन का म्हणतात? हे गेल्या काही सामन्यांमधून दाखवून दिलं. रोहितने या मोसमात आतापर्यंत 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहे. रोहितने 14 सामन्यांमध्ये 31.53 च्या सरासरीने 150.18 च्या स्ट्राईक रेटने 410 रन्स केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 22 षटकार लगावले. तसेच रोहितने या हंगामात 4 अर्धशतकंही झळकावली आहेत.
रोहित शर्माचा कारनामा
Most Player of the match award among Indian Players in IPL:
Rohit Sharma – 21*
Virat Kohli – 19
MS Dhoni – 18 pic.twitter.com/kSHfF10TvH— Johns. (@CricCrazyJohns) May 30, 2025
दरम्यान रोहितने गुजरात विरूद्धच्या 81 धावांच्या खेळीसह 2 विक्रम केले. रोहितने आयपीएल इतिहासात 300 षटकारांचा टप्पा पार केला. रोहित अशी कामगिरी करणारा ख्रिस गेल याच्यानंतर दुसरा तर पहिला भारतीय ठरला. तसेच रोहितने 7 हजार धावांचा टप्पाही पार केला.