GT vs RR : तुषार देशपांडेची कडक बॉलिंग, राजस्थानचं शेवटच्या ओव्हरमध्ये ‘कल्याण’, गुजरात विरुद्ध 6 धावांनी विजय

Gujarat Titans vs Rajasthan Royals Match Result IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने राशिद खान याच्यासारख्या कसलेल्या फलंदाजासमोर 10 धावांचा यशस्वी बचाव करत टीमला विजय मिळवून दिला.

GT vs RR : तुषार देशपांडेची कडक बॉलिंग, राजस्थानचं शेवटच्या ओव्हरमध्ये कल्याण, गुजरात विरुद्ध 6 धावांनी विजय
Tushar Deshpande GT vs RR
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 05, 2026 | 1:53 AM

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात (IPL 2026) रविवारी 4 एप्रिलला डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने होम टीम गुजरात टायटन्सवर 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. राजस्थानने या 19 व्या मोसमातील नवव्या सामन्यात गुजरातसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. गुजरातनेही या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिली. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. गुजरातला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. मात्र कल्याणच्या तुषार देशपांडे याने कमाल केली. तुषारने या 10 धावांचा यशस्वी बचाव केला. तुषारने अवघ्या 4 धावा दिल्या. त्यामुळे गुजरातला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 204 धावांपर्यंतच पोहचता आलं. राजस्थानने अशारप्रकारे सामना जिंकला. राजस्थानचा हा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला.

राजस्थानची बॅटिंग

राजस्थानच्या बाजूने या सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला. रियान पराग याने बॅटिंगचा निर्णय घेतला. राजस्थानने 200 पार मजल मारली. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 210 धावा केल्या. राजस्थानसाठी ध्रुव जुरेल याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. ध्रुवने 42 बॉलमध्ये 75 रन्स केल्या.ध्रुवने या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार लगावले. ओपनर यशस्वी जैस्वाल याने अर्धशतक झळकावलं. यशस्वीने 55 रन्स केल्या. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने 31 रन्स केल्या. डोनोवन फेरेरा याने 18 धावा जोडल्या.

गुजरातची अप्रतिम सुरुवात

गुजरातच्या सलामी जोडीने विजयी धावांचा पाठलाग करताना टीमला चाबूक सुरुवात करुन दिली. साई सुदर्शन आणि कुमार कुशाग्र या दोघांनी 78 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर राजस्थानने गुजरातला ठराविक अंतराने झटके दिले. गुजरातसाठी साईने 44 चेंडू 73 धावा केल्या. कुमार कुशाग्र याने 18 धावा जोडल्या. अनुभवी फंलदाज जोस बटलर याने 26 रन्सचं योगदान दिलं. अखेरच्या टप्प्यात राशीद खान आणि कगिसो रबाडा या दोघांनी गुजरातला 18 ओव्हरपर्यंत गुजरातला 196 धावांपर्यंत आणून ठेवलं.

तुषारची धारदार बॉलिंग

सामना रंगतदार स्थितीत

राशीद आणि रबाडाने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करुन सामना रंगतदार स्थितीत आणून ठेवला. गुजरातला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 15 धावांची गरज होती. जोफ्रा आर्चर याने 19 व्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या.  त्यामुळे गुजरातला शेवटच्या 6 बॉलमध्ये 10 रन्स हव्या होत्या. मात्र कल्याणच्या तुषार देशपांडे याने फक्त 4 धावाच दिल्या. राजस्थानने अशाप्रकारे हा सामना 6 विकेट्सने आपल्या नावावर केला.

Follow Us