AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: Virat Kohli ने संधी दिली, आता ‘त्याचं’ बुडत करिअर वाचवण्यासाठी रोहित शर्मा हात देणार?

Team India: त्याने विराटच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला. आता करिअर वाचवण्यासाठी त्याला रोहितकडून मदतीची आस.

Team India: Virat Kohli ने संधी दिली, आता 'त्याचं' बुडत करिअर वाचवण्यासाठी रोहित शर्मा हात देणार?
rohit sharma
| Updated on: Jan 12, 2023 | 9:40 AM
Share

Ranji Trophy 2022-23: सध्या टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीज सुरु आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 सीरीज 2-1 अशी जिंकली. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे सीरीजमध्ये शानदार विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे. पहिला वनडे सामना टीम इंडियाने जिंकला आहे. या सगळ्या दरम्यान एका प्लेयरला आपलं बुडत करिअर वाचवण्यासाठी रोहित शर्माकडून मदतीची अपेक्षा आहे.

फक्त टेस्टमध्ये मिळाली संधी

ज्या खेळाडूबद्दल आपण बोलतोय, त्याचं नाव आहे हनुमा विहारी. हनुमा विहारी सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत आंध्र प्रदेशच नेतृत्व करतोय. दिल्ली विरुद्ध ग्रुप बी च्या मॅचमध्ये त्याने 85 धावा केल्या. तो आंध्र प्रदेशचा कॅप्टन आहे. तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करतो. त्याने 223 चेंडूंचा सामना केला. 11 चौकार लगावले. हनुमाला टेस्ट फॉर्मेटमध्ये भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. पण तो मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये स्वत:च स्थान बनवू शकला नाही.

विराटच्या नेतृत्वाखाली डेब्यु

हनुमाने वर्ष 2018 मध्ये भारतीय टीमसाठी डेब्यु केला. इंग्लंड विरुद्ध ओव्हल मैदानावर तो पहिली टेस्ट मॅच खेळला. त्यावेळी विराट कोहली टीम इंडियाचा कॅप्टन होता. विराटने त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली. हनुमाने कॅप्टनला निराश केलं नाही. 124 चेंडूत 56 रन्स केल्या. त्याने 3 विकेट घेतले. पण टीम इंडियाचा पराभव झाला.

आता रोहित करिअर वाचवणार?

भारतीय टीम पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 कसोटी सामन्याची सीरीज खेळणार आहे. रोहित शर्मा त्यावेळी हनुमा विहारीला संधी देईल, अशी अपेक्षा आहे. पण प्लेइंग 11 मध्ये त्याचा समावेश होणं कठीण आहे. रोहितने फलंदाजी अजून बळकट करायच ठरवलं, तर त्याला संधी मिळू शकते. तो मीडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करतो. त्याला तिसऱ्या क्रमांकावर सुद्धा संधी मिळालीय. हनुमा टेस्ट फॉर्मेटमध्ये खेळतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. कशी आहे कामगिरी

29 वर्षांचा हनुमा विहारी आतापर्यंत करिअरमध्ये 16 कसोटी सामने खेळलाय. या दरम्यान त्याने एक शतक आणि 5 अर्धशतकं झळकवली आहेत. त्याने एकूण 839 धावा केल्यात. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 179 इनिंगमध्ये 8403 धावा केल्यात. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 5 तर फर्स्ट क्लासमध्ये 27 विकेट घेतल्यात.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.