IPLमध्ये सचिन तेंडुलकरचा लिलाव कधीच झाला नाही, त्यावेळी लिलावापूर्वी वाढले होते टेन्शन

Happy Birthday Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिनला मुंबई इंडियन्सने एका सीजनसाठी 4 कोटी 48 लाख 50 हजार रुपये दिले. 2010 पर्यंत सचिनचे मानधन असेच राहिले. त्यानंतर 8 कोटी 28 लाख रुपये मानधन करण्यात आले. सचिनने 2013 सीजननंतर आयपीएलमधून निवृत्ती घेतली.

IPLमध्ये सचिन तेंडुलकरचा लिलाव कधीच झाला नाही, त्यावेळी लिलावापूर्वी वाढले होते टेन्शन
Happy Birthday Sachin
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 8:19 AM

सध्या आयपीएलचा रोमांच सुरु आहे. भारत रत्न सन्मान देऊन गौरवण्यात आलेल्या सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये नेहमीच मुंबई इंडियन्स संघासोबतच राहिला आहे. त्याच्यासाठी 24 एप्रिल हा दिवस विशेष आहे. आज सचिन तेंडुलकर 51 वर्षांचा होत आहे. क्रिकेटमध्ये 100 शतक करणारा आणि 200 कसोटी सामने खेळणारा सचिन तेंडुलकर जगातील एकमेव खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या सचिनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये धूम केली. आयपीएलचा पहिला सीजन 2008 मध्ये झाला होता.

काय होते ते टेन्शन

आयपीएलचा फॉर्मेटमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. फ्रॅचाइजी आपल्या हव्या असलेल्या खेळाडूसाठी बोली लावणार? असा प्रकार हा होता. आयपीएल सुरु होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आयपीएलचा जनक म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी टेन्शनमध्ये आले होते. सर्व खेळाडूंचा लिलाव करण्यात येईल, पण क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनचा लिलाव कसा करायचा? त्याच्या लिलावामुळे तमाम क्रिकेट प्रेमी नाराज होणार नाही का? या प्रश्नांनी त्यांचे टेन्शन वाढवले होते.

मग ललित मोदी यांना मिळाला तोडगा

ललित मोदी यांनी या प्रकरणी एक प्रस्ताव ठेवला. त्यांनी सचिनसह काही दिग्गज खेळाडूंना ऑक्सनमध्ये न पाठवण्याचे सूचवले. हा पर्याय बीसीसीआयने मंजूर केला. त्यानंतर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सहवाग, राहुल द्रविड आणि युवराज सिंह यांना ऑक्सनमधून बाहेर ठेवण्यात आले. या खेळाडूंना फ्रॅचाइजी त्यांना आपल्या संघात समावेश करुन घेतील.

हे सुद्धा वाचा

कोण कोणत्या संघासोबत

सचिन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्सने घेतले. सौरव गांगुली कोलकाता नाइट राइडर्स, सहवाग दिल्ली डेयरडेविल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), राहुल द्रविड याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु तर युवराज याला किंग्स इलेवन पंजाब (आता पंजाब किंग्स) यांनी घेतले. त्यावेळी महेंद्र सिंह धोनीसह बाकी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला.

सचिनला किती मिळाले मानधन

मास्टर ब्लास्टर सचिनला मुंबई इंडियन्सने एका सीजनसाठी 4 कोटी 48 लाख 50 हजार रुपये दिले. 2010 पर्यंत सचिनचे मानधन असेच राहिले. त्यानंतर 8 कोटी 28 लाख रुपये मानधन करण्यात आले. सचिनने 2013 सीजननंतर आयपीएलमधून निवृत्ती घेतली. सचिन IPL मध्ये फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.

Non Stop LIVE Update
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.