Hardik pandya चं प्रायवेट जेट मधून उड्डाण, लग्जरी लाइफ स्टाइलचा VIDEO चर्चेत
आशिया कप (Asia cup) 2022 स्पर्धेचं काऊंटडाऊन सुरु झालय. भारत 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) आपलं अभियान सुरु करणार आहे.

मुंबई: आशिया कप (Asia cup) 2022 स्पर्धेचं काऊंटडाऊन सुरु झालय. भारत 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) आपलं अभियान सुरु करणार आहे. क्रिकेट जगत या सामन्याची आतुरते वाट पाहतेय. टीम इंडियाने सुद्धा या सामन्यासाठी कंबर कसली आहे. पाकिस्तान विरुद्ध मैदानावर उतरण्याआधी ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने (Hardik pandya) आपली टशन दाखवली. त्याने आपल्या लग्जरी लाइफचा एक व्हिडिओ शेयर केलाय. ज्यामुळे सोशल मीडियावर तुफान आलय.
ट्रेनिंगशी हार्दिकने कुठलीही तडजोड केली नाही
आशिया कप आधी हार्दिक पंड्या आपलं कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवतोय. पण त्याचवेळी त्याने कठोर मेहनत आणि सरावही सोडलेला नाही. ब्रेकवर असतानाही हार्दिक पंड्या मैदानात घाम गाळतोय. त्याने इन्स्टाग्रामवर एक रील शेयर केलीय. ज्यात हार्दिकने त्याचा संपूर्ण दिवस कसा जातो, ते दाखवलं. हार्दिक पंड्या नेहमीच चर्चेत असतो. या व्हिडिओत भारताचा स्टार ऑलराऊंडर आपल्या प्रायवेट जेट मधून प्रवास करताना दिसतोय. बिजी शेड्युल मधूनही हार्दिकने आई, पत्नी आणि मुलांसाठी वेळ काढला.
View this post on Instagram
पंड्यासाठी 2022 शानदार वर्ष होतं
हार्दिक पंड्याच्या व्हिडिओवर वहिनी पंखुरी शर्माने हार्टचा इमोजी शेयर केलाय. भारतीय ऑलराऊंडरसाठी हे शानदार वर्ष होतं. आयपीएल 2022 पासून हार्दिकने एक नवीन सुरुवात केलीय. गुजरात टायटन्सच नेतृत्व करताना पहिल्याच सीजन मध्ये त्याने संघाला चॅम्पियन बनवलं.
