हार्दिक पांड्या लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये करणार कमबॅक? माजी खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ

भारताची गेल्या वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये पिछेहाट झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ग्रहण लागल्याचं दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिकाही गमावली. त्यामुळे आता संघात बदल करण्याची मागणी जोर धरत आहे. असं असताना हार्दिक पांड्याच्या कमबॅकबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

हार्दिक पांड्या लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये करणार कमबॅक? माजी खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ
हार्दिक पांड्या लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये करणार कमबॅक? माजी खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ
Image Credit source: Instagram/Hardik Pandya
| Updated on: Dec 30, 2025 | 4:29 PM

भारताकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद असावं अशी इच्छा प्रत्येक भारतीयांची आहे. भारताला दोन जेतेपदाने हुलकावणी दिली. तर तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला. कारण तिसऱ्या अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमुळे भंगलं होतं. या मालिकेत क्लिन स्विप मिळाल्याने पुढचं गणित बिघडलं. त्यामुळे चौथ्या पर्वात टीम इंडिया पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागली. इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली. वेस्ट इंडिजला क्लिन स्विप दिला. पण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लिन स्विप मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगणार असंच दिसत आहे. असं असताना नव्या वर्षात संघात बदल करण्याची मागणी जोर धरत आहे. या संघात समतोलपणा आणण्यासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याची संघात निवड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाच्या वक्तव्याने या मागणीला बळ मिळालं आहे. सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आलं आहे. रॉबिन उथप्पाने कसोटी संघाला एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची गरज असल्याचं सांगितलं. रॉबिन उथप्पा म्हणाला की, ‘जर हार्दिक पांड्या कसोटीत सातव्या क्रमांकावर परत आला तर खूप चांगलं होईल. ज्या पद्धतीने तो खेळत आहे. काहीही होऊ शकतं. ये क्रिकेट आहे. काहीच सांगता येत नाही. हार्दिक पांड्याने कसोटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला तर बीसीसीआय त्याला नकार देईल? जर तो सांगत असेल मी खेळू इच्छितो आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकू इच्छितो. तर मला नाही वाटत की ते नकार देतील.’

रॉबिन उथप्पाने पुढे सांगितलं की, ‘अष्टपैलू 20 षटकं टाकतात का? नितीश कुमार तितकी गोलंदाजी करत नाही. तो जवळपास 12 षटकं जातो. जर हार्दिक एक डावात 12 ते 15 षटके टाकू शकतो. मला वाटते की जो त्या पद्धतीने फिट आहे, ज्या पद्धतीने गोलंदाजी आणि फलंदाजी करत आहे. त्यामुळे सहज तो करू शकतो. पण हा निर्णय त्याचा असेल. ‘