रोहित शर्माला कर्णधारपद देताच हार्दिक पांड्याचा व्हिडीओ चर्चेत, आता काय केलं ते पाहा

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून हार्दिक पांड्या बाहेर गेला तो अजून काही परतला नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली त्यातून तो सावरलाच नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि आता अफगाणिस्तान मालिकेला मुकला आहे. सूर्यकुमार यादवही जखमी आहे. त्यामुळे आता नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. पण हार्दिक पांड्याने एक व्हिडीओ पोस्ट फिट असल्याचं दाखवून दिलं आहे.

रोहित शर्माला कर्णधारपद देताच हार्दिक पांड्याचा व्हिडीओ चर्चेत, आता काय केलं ते पाहा
| Updated on: Jan 08, 2024 | 7:44 PM

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी रोहित शर्माच्या खांद्यावर धुरा सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव जखमी असल्याने रोहित शर्माचा विचार केला गेला, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. रोहित शर्मा गेल्या दीड वर्षांपासून टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. त्यामुळे त्याचं कमबॅक 2024 टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव फिट होईल की नाही याबाबतही शंका आहे. हार्दिक पांड्या वारंवार दुखापतग्रस्त होणं टीम इंडियासाठी घातक ठरत आहे. त्यामुळे त्याच्या जागी योग्य पर्यायाची निवड करणं हे बीसीसीआयसमोर आव्हान आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करत रोहित शर्माकडे नेतृत्व सोपण्यात आलं आहे. असं असताना हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ चर्चेत आता आला आहे. या व्हिडीओतून हार्दिक पांड्या फिट अँड फाईन असल्याचे संकेत देत आहे. आयपीएल 2024 स्पर्धेत खेळणार असंच यावरून स्पष्ट होत आहे. तसेच टी20 वर्ल्डकपसाठी फिट असल्याचे संकेतही त्याने या माध्यमातून दिले आहेत.

हार्दिक पांड्याने रिकव्हरी दरम्यान हेवी वेटलिफ्टिंग सुरु केली आहे. व्हिडीओमधून ही बाब स्पष्ट होत आहे. या व्हिडीओत हार्दिक पांड्या एकदम फिट अँड फाईन असून पुढच्या वाटचालीसाठी सज्ज आहे. हार्दिक पांड्याने व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘पुढे जाण्याची फक्त एकच दिशा आहे, ती म्हणेज पुढे जाणं’. त्याची कॅप्शन बरंच काही सांगून जात आहे. हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेलाही मुकला आहे. आता टी20 वर्ल्डकपमधील निवड फिटनेस आणि आयपीएल 2024 स्पर्धेच्या कामगिरीवर आहे. हार्दिक पांड्या अष्टपैलू असल्याने त्याचं संघात असणं महत्त्वाचं देखील आहे.

हार्दिक पांड्याला वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दुखापत झाली होती. बांगलादेश विरुद्ध पुण्यात खेळलेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होात. त्यामुळे सामना मध्येच सोडून जावं लागलं होतं. त्यानंतर कमबॅक करेल अशा अनेक बातम्या आल्या पण हार्दिक काही परतला नाही. हार्दिक पांड्याकडे आता मुंबई इंडियन्सची धुरा आहे. आता या स्पर्धेत खेळताना दिसू शकतो.