नवीन वर्षात गरिबी दूर करायची, मग 2026 सुरु होण्याआधी करा हे काम
२०२६ हे सूर्याचे वर्ष तुमच्यासाठी यशाचे ठरेल. तांब्याचा सूर्य, कुबेर मूर्ती आणि जल तत्त्वांचे योग्य नियोजन करून घरात सुख-समृद्धी कशी आणायची, याची सविस्तर माहिती या लेखात वाचा.

नवीन वर्ष येण्यासाठी आता काहीच काळ शिल्लक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, २०२६ हे वर्ष सूर्याचे वर्ष म्हणून ओळखले जाते. सूर्य हा ग्रहांचा राजा असून तो सत्ता, अधिकार, आरोग्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. ज्यांच्या पत्रिकेत सूर्य प्रबळ असतो, त्यांना समाजात मान-सन्मान आणि यश सहज मिळते. २०२६ या वर्षाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी वास्तुशास्त्रात काही विशेष वस्तू आणि बदलांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जर तुम्ही हे बदल केला तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो.
तांब्याचा सूर्य
तांबे हा धातू सूर्याचे प्रतिनिधित्व करतो. जर तुम्हाला नोकरीत पदोन्नती हवी असेल किंवा व्यवसायात नाव कमवायचे असेल, तर घराच्या मुख्य हॉलमध्ये किंवा ईशान्य कोपऱ्यात तांब्याचा सूर्य लावावा. हा सूर्य जमिनीपासून ७ ते ८ फूट उंचीवर असावा जेणेकरून त्याची दृष्टी संपूर्ण घरावर पडेल. यामुळे घरातील सदस्यांमधील भांडणे कमी होऊन परस्पर प्रेम वाढते. तसेच मुलांच्या अभ्यासात एकाग्रता येते.
सूर्यफुलाचे चित्र
सूर्यफूल हे सूर्याच्या दिशेने फिरणारे फूल आहे, जे सतत प्रगतीचे प्रतीक मानले जाते. घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत सूर्यफुलाची रोपे लावा. जर शक्य नसेल, तर घराच्या पूर्व भिंतीवर सूर्यफुलाचे चित्र लावावे. या फुलांमुळे मानसिक तणाव दूर होतो आणि घरात नेहमी प्रसन्न वातावरण राहते.
वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेर आणि बुध ग्रहाची मानली जाते. २०२६ मध्ये सूर्याच्या तेजासोबत कुबेराची कृपा मिळवण्यासाठी उत्तर दिशेला विशेष महत्त्व द्या. या दिशेला पितळ किंवा चांदीची कुबेर मूर्ती स्थापन करा. ही दिशा कधीही अंधारात ठेवू नका. येथे हलका निळा किंवा पांढरा रंग वापरणे अधिक लाभदायक ठरेल.
पैशाचा ओघ वाढवण्यासाठी काय करावे?
पैशाचा ओघ वाढवण्यासाठी पाण्याचे स्थान योग्य असणे गरजेचे आहे. उत्तर दिशेला मातीच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवा. त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यास लक्ष्मी प्रसन्न होईल. यामुळे पैसा टिकून राहतो. तसेच अक्षता हे समृद्धीचे प्रतीक आहे. एका छोट्या चांदीच्या वाटीत किंवा भांड्यात पूर्ण तांदूळ भरून ते उत्तर दिशेला सुरक्षित ठिकाणी ठेवा. चांदी चंद्राचे तर तांदूळ अन्नाचे प्रतीक आहे. सूर्य आणि चंद्राच्या या मिश्रित ऊर्जेमुळे घरात अन्नाची आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही.
दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. घराच्या उत्तर आणि पूर्व कोपऱ्यातून जुन्या, तुटलेल्या किंवा जड वस्तू त्वरित हटवा. येथे जड कपाट किंवा फर्निचर असल्यास ते दक्षिण किंवा पश्चिम दिशेला हलवा. सकाळी किमान १ तास घराच्या सर्व खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून सूर्याची कोवळी किरणे घरात प्रवेश करतील.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
