
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतली चौथ्या दिवशीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात दुसऱ्या डावात भारताचा शेवटचा विकेट प्रसिद्ध कृष्णाच्या रुपाने पडला. या विकेटसाठी इंग्लंडने माईंड गेम खेळला आणि प्रसिद्ध कृष्णाची विकेट काढली. खरं तर ही विकेट पडली नसती तर अधिक धावा झाल्या असत्या. कारण एका बाजूने रवींद्र जडेजा चांगली फलंदाजी करत होता. रवींद्र जडेजाने शोएब बशीरच्या गोलंदाजीच्या पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर शेवटच्या चेंडूचा सामना करताना प्रसिद्ध कृष्णाने उत्तुंग फटका मारला. यात जोश टंगने त्याचा झेल पकडला आणि खेळ संपला. पण या विकेट आधी इंग्लिश खेळाडूंच्या त्याच्याशी संवाद साधून ट्रॅप टाकला होता. त्यात प्रसिद्ध कृष्णा अडकला. याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध कृष्णाने रागाच्या भरात उंच फटका मारला आणि विकेट देऊन बसला. हॅरी ब्रूकने यासाठी त्याला उकसवलं होतं. स्टार स्पोर्ट्सने हा व्हिडीओ आता शेअर केला आहे. यात स्टंप माइकमध्ये हॅरी ब्रूकचा आवाज रेकॉर्ड झाला आहे.
हॅरी ब्रूकने प्रसिद्ध कृष्णाला सांगितलं की, ‘काय तू उंच षटकार मारू शकतोस का?’ यावर प्रसिद्ध कृष्णाने उत्तर दिलं की, असं झालं असतं तर मी हॅरी ब्रूक झालो असतो. या संवादानंतर पुढच्याच चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने शोएब बशीरला उंच फटका मारला. सीमेजवळ असलेल्या जोश टंगने झेल पकडताना चूक केली नाही आणि झेल पकडला. प्रसिद्ध कृष्णा बरोबर हॅरी ब्रूकच्या जाळ्यात अडकला.
“Can you hit big sixes?” — Harry Brook on the stump mic… and Prasidh goes for it on the very next ball and gets out.
Classic Test cricket theatre — brought to you by the mic (and a bit of mischief). 🎭#ENGvIND | 1st Test, Day 5 | TUE, 24th JUNE, 2:30 PM on JioHotstar! pic.twitter.com/Bgwq5D3PiB
— Star Sports (@StarSportsIndia) June 24, 2025
भारताने दुसऱ्या डावात अवघ्या 31 धावांवर 6 विकेट गमावल्या. 364 धावांवर सर्वबाद झाले. खरं तर भारताने आरामात 400 पार धावा केल्या असत्या. पण पहिल्या डावासारख्यात दुसऱ्या डावात शेपटच्या फलंदाजांनी माती खाल्ली. त्यामुळे इंग्लंडसमोर 371 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. पाटा विकेट असल्याने या धावा गाठणं सोपं होतं. त्यामुळे इंग्लंडने चांगली सुरुवात केली. जोश टंगने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात चार चेंडूत 3 गडी बाद केले.