AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hasin Jahan: मोहम्मद शमीच्या बायकोला ट्रेन प्रवासात आला भयानक अनुभव, TC वर गंभीर आरोप

Hasin Jahan: ट्रेन प्रवासात हसीन जहाँसोबत काय घडलं?

Hasin Jahan: मोहम्मद शमीच्या बायकोला ट्रेन प्रवासात आला भयानक अनुभव, TC वर गंभीर आरोप
Haseen jahanImage Credit source: instagram
| Updated on: Oct 16, 2022 | 4:10 PM
Share

मुंबई: टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रेल्वेच्या टीसीने आपल्यासोबत गैरवर्तन केलं, असा आरोप हसीन जहाँने केला आहे. गुरुवारी रात्री बिहारहून (Bihar) कोलकात्याला जात असताना टीसीने आपल्यासोबत गैरवर्तन केलं, असा आरोप हसीन जहाँने केला आहे.

रेल्वे अधिकारी काय म्हणाला?

या प्रकरणात रेल्वेकडे अजून अधिकृत तक्रार आलेली नाही, असं पूर्व रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितलं. या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करु असं आश्वासन या अधिकाऱ्याने दिलय. हसीन जहाँ एका नातेवाईकाच्या लग्नासाठी बिहारला गेली होती. तिथून कोलकात्याला परतत असताना, हा प्रकार घडला. जोगबानी एक्स्प्रेसमध्ये तिला अप्पर बर्थ देण्यात आला होता.

शिवराळ भाषा वापरली

“लोअर बर्थ रिकामी होता. सहप्रवाशाच्या विनंतीवरुन मी लोअर बर्थवर शिफ्ट झाली. गुरुवारी रात्री तिकीट तपासणारा कर्मचारी आला. त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. त्याने शिवराळ भाषा वापरली. कर्मचाऱ्याने माझा मोबाइलही फेकला. अखेर मी पोलिसांची मदत घेतली. त्यांच्या सुरक्षेत मी कोलकाकत्यात प्रवेश केला” असं हसीन जहाँने सांगितलं.

हार्दिक पंड्याचा फोटो पोस्ट केला

मागच्या महिन्यात आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर हसीन जहाँने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात तिने हार्दिक पंड्याचा फोटो पोस्ट केला होता. हार्दिकच कौतुक करताना तिने शमीवर टीका केली होती. हसीन जहाँ मोहम्मद शमीपासून विभक्त झाली आहे. मागच्या काही वर्षांपासून दोघे वेगवेगळे राहतात. 2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.