महेंद्रसिंह धोनीचं नाणं निघालं ‘खोटं’, आयपीएल 2025 लिलावापूर्वीच पर्दाफाश! झालं असं की…

PIB Fact Check : गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंह धोनीचं एक नाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाणं आणणार असल्याचं दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र हे सर्व खोटं असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत पीआयबीने खरं काय ते सांगून टाकलं आहे.

महेंद्रसिंह धोनीचं नाणं निघालं खोटं, आयपीएल 2025 लिलावापूर्वीच पर्दाफाश! झालं असं की...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Nov 15, 2024 | 5:27 PM

क्रिकेटविश्वात महेंद्रसिंह धोनीचा नावलौकीक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी धोनीचा क्रेझ काही कमी झालेला नाही. सध्या महेंद्रसिंह धोनी 42 वर्षांचा असून 2025 आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार हे नक्की झालं आहे. चेन्नई सुपर किंग्सने त्याला अनकॅप्ड प्लेयर म्हणून 4 कोटी रुपयांना रिटेन केलं आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंह धोनी, 7 रुपयांचं नाणं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशी नावं घेत एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या सन्मानार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 7 रुपयांचं नाणं जारी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. खरं तर या पोस्टमध्ये चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. कारण महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानात 7 नंबरची जर्सी परिधान करून उतरतो. इतकंच भारतीय संघातून जर्सी नंबर 7 रिटायर झाली आहे. असं असताना 7 या आकड्याचं धोनीशी संबंध आहे. पण पीआयबीने आपल्या फॅक्ट चेकमध्ये या पोस्टची पोलखोल केली आहे. असं कोणतंच नाणं आरसीबीआयकडून जारी केलेलं नाही. तसेच डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक अफेयर्सने याबाबत कोणती पोस्ट केली आहे. पीआयबीने या पोस्टबाबत सत्यता पडताळणी करत खरं काय ते सांगून टाकलं आहे.

पीआयबीने हा फोटो पोस्ट करत सरळ स्पष्ट लिहिलं आहे की, या फोटोत केलेला दावा खोटा आहे. डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक अफेयर्सने अशी कोणतीच घोषणा केलेली नाही. अर्थ मंत्रालयालाही याबाबतची माहिती मिळाली होती. यामुळे लोकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अर्थ मंत्रालयाने पावलं उचलतं एक्स खात्यावर याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानंतर पीआयबीच्या फॅक्ट चेकने ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. त्यामुळे या 7 नंबरी नाण्याची बाजू खोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तुम्हालाही जर महेंद्रसिंह धोनीच्या नाण्याबाबत काही कळलं किंवा पाहिलं असेल तर ते साफ खोटं आहे हे लक्षात ठेवा. सोशल मीडियावर एक फोटो सर्क्युलेट केला जात आहे की, महेंद्रसिंह धोनीच्या क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीसाठी त्याच्या सन्मानार्थ एक नवं 7 रुपयांचं जारी केलं जाणार आहे. पण ते खोटं असल्याचं पीआयबी फॅक्ट चेकमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, महेंद्रसिंह धोनीचं हे शेवटचं आयपीएल पर्व असावं अशी एक चर्चा रंगली आहे. पण अशी चर्चा गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरु आहे. मात्र तसं काहीच झालं नाही. उलट 2023 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद मिळवलं. सध्या चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडच्या हाती आहे. तर धोनी विकेटच्या मागून ऋतुराजला मार्गदर्शन करत आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे मेगा लिलावात धोनीच्या संघात कोण येते? इथपासून हे पर्व खूपच महत्त्वाचं ठरणार आहे.