Jay Shah: जय शाह यांची कशी झाली क्रिकेटमध्ये एन्ट्री? ICC इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष
new icc chairman : जय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. जय शाह यांनी खूप कमी वयातच क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली होती. हळूहळू त्यांचा दबदबा वाढत गेला. अखेर आज त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आयसीसीचा अध्यक्ष होण्याचा प्रवास कसा होता जाणून घेऊयात.

जय शाह आता आयसीसीचे नवे अध्यक्ष झाले आहेत. जय शाह यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांनी आधीच तिसरी टर्म घेण्यास नकार दिला होता, त्यामुळे भारताचे जय शाह यांचे वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. जय शाह यांनी फार कमी वेळात एवढं मोठं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे अनेकदा मनात प्रश्न पडतो की तो क्रिकेट विश्वात कसा आला?
क्रिकेटमध्ये प्रवेश कसा झाला?
जय शाह तरुण वयापासूनच क्रिकेट प्रशासनाशी संबंधित होते. 2009 मध्ये फक्त 21 वर्षांचे असताना ते सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट (अहमदाबाद) च्या कार्यकारी मंडळाचे सदस्य झाले होते. क्रिकेट प्रशासनातील त्यांचा दबदबा वाढत गेला. केवळ चार वर्षांनी म्हणजे 2013 मध्ये त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) मध्ये संयुक्त सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली. जय शाह यांचे वडील अमित शाह जीसीएचे अध्यक्ष होते. जीसीएचे सहसचिव पदावर असताना जय शाह यांनी बांधकामाचे काम पाहिले, ज्यात नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पुनर्बांधणीचाही समावेश होता.
2015 मध्ये बीसीसीआयमध्ये आगमन
2015 मध्ये जय शाह बीसीसीआयमध्ये ‘वित्त आणि विपणन समिती’चे सदस्य बनले. या काळात ते अनेक वर्षे GCA चे संयुक्त सचिवही राहिले. 2019 मध्ये संयुक्त सचिव पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर केवळ एक महिन्यानंतर, ते बीसीसीआयच्या इतिहासातील सर्वात तरुण सचिव म्हणून निवडले गेले. 2022 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, त्यांची सचिव म्हणून पुन्हा निवड झाली आणि त्यांचा सध्याचा कार्यकाळ 2025 मध्ये संपणार आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेची जबाबदारी
बीसीसीआयचे सचिवपद सांभाळताना जय शाह यांनी २०२१ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्षपदही स्वीकारले. जय शाह यांचा कार्यकाळ 2024 च्या सुरुवातीला संपला आणि पुढील ACC अध्यक्ष श्रीलंकेतून निवडला जाणार असला तरी, श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी जय शाह यांच्या पदावर कायम राहण्याच्या समर्थनार्थ मत दिले होते.
आता ICC चेअरमन झाले
जय शाह आता वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी आयसीसीचे अध्यक्ष बनणार असून त्यांचा कार्यकाळ 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या पाच जणांनी अध्यक्षपद भूषवले आहे. सध्या ICC चेअरमन असण्यासोबतच शाह हे बीसीसीआयचे सचिव आणि ACC चे अध्यक्षपदही सांभाळतील.
