AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेत उलथापालथ, इंग्लंडला अंतिम फेरीसाठी काय करावं लागणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यत सुरु असताना गुणतालिकेत मोठी उलथापालथ होत आहे. इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करत एक पाऊल अंतिम फेरीच्या दिशेने टाकलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार असले तरी इंग्लंडलाही तितकीच संधी आहे. त्यामुळे जय पराजयानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेत उलथापालथ, इंग्लंडला अंतिम फेरीसाठी काय करावं लागणार?
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 11, 2024 | 5:32 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ सध्या अव्वल स्थानी आहे. भारताला अजून 8 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी काही करून 5 सामन्यात विजय मिळाला तरच अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे.  भारतीय संघ 11 पैकी 8 सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहून 74.24 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 62.50 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या, तर श्रीलंका 55.56 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानी आहे. असं असताना इंग्लंडनेही अंतिम फेरीच्या दिशेने कूच केली आहे. इंग्लंडने पाकिस्तानचा पहिल्या कसोटी एक डाव आणि 47 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडची विजयी टक्केवारी ही 45.59 इतकी आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत इतर कोणत्याही संघांच्या तुलनेत इंग्लंडने आतापर्यंत सर्वाधिक सामने खेळले आहेत. इंग्लंडने आतापर्यंत 17 सामने खेळले आहेत यात 9 सामन्यात विजय, 7 सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. इंग्लंडने नुकताच श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेकडून पराभव झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्याची संधी लांबली. आता उर्वरित सर्व 5 कसोटी सामने जिंकणे आवश्यक आहे आणि नशिबाची साथ आवश्यक आहे.

इंग्लंडला अजून 5 सामने खेळायचे आहेत. या स्पर्धेत इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. त्यामुळे अंतिम फेरीचं चित्र बिघडलं. त्यात स्लो ओव्हर रेटमुळे विजयी टक्केवारीतून 19 गुण कापले. त्यामुळे अंतिम फेरीत गाठण्यासाठी उर्वरित पाच सामने जिंकावे लागतील. तसेच भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीकडे लक्ष असेल. इंग्लंडचे शेवटचे पाच सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत. पाकिस्तानविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे अंतिम फेरीत पात्र होण्याची शक्यता फक्त 10 टक्के आहे.

दुसरीकडे, गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ रसातळाला गेला आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीच्या सर्वच आशा संपुष्टात आल्या आहेत. आता चमत्कार घडला तरी पाकिस्तानच अंतिम फेरी गाठणं कठीण आहे. पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीत आतापर्यंत 8 सामने खेळला आहे. त्यात दोन सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पाकिस्तानची विजयी टक्केवारी ही 16.67 इतकी आहे.

Follow Us
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या