मी 6 बॉलवर 6 सिक्सर मारल्यानंतर धोनीची ‘अशी’ होती रिअ‍ॅक्शन, युवराज सिंगचा 13 वर्षानंतर खुलासा

जेव्हा मी ब्रॉडला सलग 6 सिक्स मारले होते, तेव्हा धोनीचा आनंद गगनात मावत नव्हता, असं युवराजने सांगितलं. एकंदरितच 'थोडा खट्टा थोडा मिठा'  असं धोनी आणि युवराजचं नातं होतं, असं म्हणायला हरकत नाही. (MS Dhoni Yuvraj Singh)

मी 6 बॉलवर 6 सिक्सर मारल्यानंतर धोनीची अशी होती रिअ‍ॅक्शन, युवराज सिंगचा 13 वर्षानंतर खुलासा
MS Dhoni And Yuvraj Singh
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 7:37 AM

मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने (Yuvraj Singh) एका कार्यक्रमात टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीसोबतचं (MS Dhoni) आपलं नातं उलगडून दाखवलं. धोनीसोबतचं नातं सांगताना त्याने जे जे मनात आहे ते ते सर्व सांगितलं. कशाचीही हयगय केली नाही. अगदी धोनी माझ्या कर्णधारपदाच्या आड आला, असंही बेधडकपणे युवराजने सांगितलं. त्याच मुलाखतीत त्याने, जेव्हा मी ब्रॉडला सलग 6 सिक्स मारले होते, तेव्हा धोनीचा आनंद गगनात मावत नव्हता, असंही  सांगितलं. एकंदरितच ‘थोडा खट्टा थोडा मिठा’ असं धोनी आणि युवराजचं नातं होतं, असं म्हणायला हरकत नाही. (how Was MS Dhoni reaction When yuvraj Singh Smashed 6 ball 6 Six)

जेव्हा मी सहा सिक्स मारले….

युवराज सिंगने 2007 टी -20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध सलग 6 षटकार मारले होते. युवराजने ’22 यार्न्स ‘या पॉडकास्टशी संवाद साधताना धोनीची त्या वेळी काय प्रतिक्रिया होती हे तब्बल 13 वर्षानंतर सर्वांना सांगितली.

मी जेव्हा 6 सिक्स मारले होते तेव्हा धोनीला खूप आनंद झाला होता. मला वाटतं जेव्हा तुम्ही संघाचे कर्णधार असता आणि संघातला एक खेळाडू लागोपाठ सिक्स मारत असतो आनंद होतोच कारण स्कोअरबोर्ड धात असतो आणि मॅचही जिंकणं गरजेची असते. ती मॅच तर टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमधली होती… असं युवराज म्हणाला.

मला सोडून धोनीला कर्णधारपद दिलं गेलं, युवराजची खंत

पहिला टी-20 विश्वचषक… त्यात भारताचा अंतिम सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय…. ज्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला आयसीसी स्पर्धा विजय मिळवलेली ही स्पर्धा सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि यादगार आहे. पण भारताचा महान अष्टपैलू युवराज सिंगने याच स्पर्धेबाबत एक खंत व्यक्त केलीये. ‘या स्पर्धेत मला कर्णधारपद मिळेल असं वाटत होतं. पण मला न देता धोनीला कर्णधारपद देण्यात आलं.’ अशी खंत युवराजने व्यक्त केली आहे.

‘माझ्यासाठी कर्णधार होण्याची चांगली संधी होती’

22 यार्न्स या पॉडकास्टमध्ये बोलताना युवी म्हणाला, “T20 विश्वचषकादरम्यान सर्व दिग्गज खेळाडू विश्रांतीवर होते. सर्व तरुण खेळाडूंना संधी दिली होती. त्यामुळे मला कर्णधार केलं जाईल अशी मला आशा होती. माझ्यासाठी ती मोठी संधीही होती. पण अचानक एमएस धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली. धोनी माझ्या कर्णधारपदाच्या आड आला”

(how Was MS Dhoni reaction When yuvraj Singh Smashed 6 ball 6 Six)

हे ही वाचा :

‘हा’ खेळाडू माझ्या आणि कर्णधारपदाच्या आड आला, युवराज सिंगचा मोठा दावा

‘आणखी चांगला क्रिकेटर होऊ शकलो असतो’, वीरेंद्र सेहवागने क्रिकेट सोडल्यानंतर 6 वर्षांनी व्यक्त केली खंत, म्हणाला…