AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा’ खेळाडू माझ्या आणि कर्णधारपदाच्या आड आला, युवराज सिंगचा मोठा दावा

युवराज सिंग भारताचा एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू होता. 2007 चा टी-20 आणि 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

'हा' खेळाडू माझ्या आणि कर्णधारपदाच्या आड आला, युवराज सिंगचा मोठा दावा
yuvraj Singh
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 6:10 PM
Share

मुंबई : पहिला टी-20 विश्वचषक (T 20 World Cup 2007) त्यात भारताचा अंतिम सामन्यात पाकिस्तानवर (Pakistan) रोमहर्षक विजय. ज्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महेंद्र सिंग धोनीच्या (MS Dhoni) कर्णधारपदाखाली पहिला मोठा विजय मिळवलेली ही स्पर्धा सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि यादगार आहे. पण भारताचा महान अष्टपैलू युवराज सिंगने (Yuvraj Singh) याच स्पर्धेबाबत एक खंत व्यक्त केलीये. ‘या स्पर्धेत मला कर्णधारपद मिळेल असं वाटत होतं. पण मला न देता धोनीला कर्णधारपद देण्यात आलं.’ अशी खंत युवराजने व्यक्त केली आहे. (Indian Cricketer Yuvraj Singh says Mahendra Singh Dhoni Comes between Me And My Captainship)

युवराज सिंगने 22 यार्न्स या पॉडकास्टमध्ये या गोष्टीचा खुलासा केला. म्हणजे स्पर्धेच्या तब्बल 14 वर्षानंतर युवराजने ही खंत बोलून दाखवली. तो म्हणाला, ”मला या स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार होण्याचं स्वप्न होतं. पण धोनीला कर्णधारपद दिल्यामुळे माझ्या कर्णधारपदाच्या स्वप्नाच्या आड धोनी आला”

‘माझ्यासाठी कर्णधार होण्याची चांगली संधी होती’

22 यार्न्स या पॉडकास्टमध्ये बोलताना युवी म्हणाला, “T20 विश्वचषकादरम्यान सर्व दिग्गज खेळाडू विश्रांतीवर होते. सर्व तरुण खेळाडूंना संधी दिली होती. त्यामुळे मला कर्णधार केलं जाईल अशी मला आशा होती. पण अचानक एमएस धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली.”

‘नाते मात्र बिघडले नाही’

युवराजसाठी एमएस धोनी कर्णधार होणार हा निर्णय धक्कादायक होता. पण तरीदेखील धोनी आणि त्याच्या नात्यात कडूपणा आला नाही. युवराजने खेळाडू वृत्तीने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी कर धोनीला सपोर्ट केला. धोनी आणि युवराज यांनी मिळून कितीतरी महत्त्वाचे सामने भारताला जिंकवून दिले.

हे ही वाचा :

‘आणखी चांगला क्रिकेटर होऊ शकलो असतो’, वीरेंद्र सेहवागने क्रिकेट सोडल्यानंतर 6 वर्षांनी व्यक्त केली खंत, म्हणाला…

राहुल द्रविडने 13 वर्षांपूर्वी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यामुळे बदललं जीवन, भारताच्या दिग्गज खेळाडूची कबुली

WTC Final : भारतीय संघ मोठ्या पेचात, महत्वाच्या खेळाडूला बाहेर बसवण्याची शक्यता

(Indian Cricketer Yuvraj Singh says Mahendra Singh Dhoni Comes between Me And My Captainship)

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना