AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लॉप ठरलेला चित्रपट अचानक OTT वर येताच ठरला हिट, नंबर 1 वर करतोय ट्रेंड, पाहण्यासाठी लोकांची गर्दी

थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला चित्रपट अचानक ओटीटीवर येताच ठरला हिट. काही तासांमध्ये या चित्रपटाने मिळवलं नंबर 1 वर स्थान. लोक ओटीटीवर सर्च करून बघत आहेत चित्रपट.

फ्लॉप ठरलेला चित्रपट अचानक OTT वर येताच ठरला हिट, नंबर 1 वर करतोय ट्रेंड, पाहण्यासाठी लोकांची गर्दी
| Updated on: Aug 17, 2026 | 3:39 PM
Share

ओटीटीच्या वाढत्या प्रभावामुळे आजकाल एखादा चित्रपट थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळवू शकला नाही, तरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याला नव्याने प्रेक्षक मिळताना दिसतात. आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’नंतर आता कंगना रनौतच्या एका चित्रपटाबाबतही असंच चित्र पाहायला मिळत आहे. कंगनाच्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाने थिएटरमध्ये फारशी कमाई केली नसली तरी ओटीटीवर रिलीज होताच त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट 14 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. चित्रपटाची भारतातील कमाई सुमारे 6.67 कोटी रुपये तर जगभरातील कमाई जवळपास 8.16 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. समीक्षकांकडून चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही.

ओटीटीवर फ्लॉप चित्रपट ठरला हिट

मात्र आता ओटीटीवर चित्रपटाचं चित्र पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळत आहे. 14 ऑगस्ट रोजी हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर ‘भारत भाग्य विधाता’ने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि तो ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.

‘भारत भाग्य विधाता’ची कथा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात सरकारी रुग्णालयातील नर्सेस संकटाच्या काळात दाखवलेलं धैर्य आणि प्रसंगावधान अधोरेखित करण्यात आलं आहे. दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीत नर्सेस आपल्या जीवाची पर्वा न करता लहान मुलांसह अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतात हे चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. कंगना रनौतने यात प्रमुख भूमिका साकारली आहे.

कंगनाचा आगामी चित्रपट कोणता?

थिएटरमध्ये अपयशी ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवर मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याने ‘भारत भाग्य विधाता’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकदा थिएटरमध्ये प्रेक्षक न मिळालेल्या चित्रपटांना डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे नवा प्रेक्षकवर्ग मिळतो. कंगनाच्या या चित्रपटाबाबतही सध्या असंच चित्र दिसत आहे.

दरम्यान, कंगना रनौतच्या आगामी प्रोजेक्ट्सकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. माहितीनुसार, ती ‘सर्कल’ आणि ‘क्वीन 2’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘क्वीन 2’ हा 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘क्वीन’ या चित्रपटाचा सीक्वल असणार आहे. त्यामुळे कंगनाच्या आगामी चित्रपटांकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!