
मुंबई : भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने मालिका खिशात घातली आहे. दुसऱ्या सामना भारताने 33 धावांनी जिंकला. या सामन्यात ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि रिंकू सिंह यांनी फलंदाजीत कमाल केली. तर जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिष्णोई यांनी गोलंदाजीत दाणादाण उडवून दिली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. असं असलं तरी आयर्लंडकडून अँडी बॅलबिर्नी 51 धावा आणि मॅककार्थी याने दोन गडी बाद केले होत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिल्या दोन सामन्यात काही खेळाडू चमकले. तर काही खेळाडूंनी हवी तशी कामगिरी केलेली नाही. तिसऱ्या सामन्यात कोणत्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळेल आणि कोणत्या खेळाडूला संधी मिळेल याबाबत उत्सुकता आहे.
आयर्लंडमध्ये सध्या थंड वातावरण असून तापमान 16 अंश सेल्सिअस असणार आहे. आर्द्रता 75 टक्क्यांपर्यंत असेल. हवेचा वेग ताशी 14 किमी असू शकतो. असं असलं तरी डब्लिन पिच फलंदाजीसाठी पूरक आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही फलंदाजांना मदत होणार आहे. काही अंशी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत होईल. फिरकीपटूंना या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं जाईल. दुसरीकडे, हवामान ढगाळ राहील आणि पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
प्रथम फलंदाजी करणारा संघ 170 पर्यंत धावा करू शकतो. तर या मैदानावर विजयी धावांचा पाठलाग करणं सोपं नाही. विजयी धावा गाठण्याची टक्केवारी 40 टक्क्यांपर्यंत आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 7 सामने झाले असून सर्व सामने टीम इंडियानेच जिंकले आहेत. आता मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकल्यास आयर्लंडला व्हाइटवॉश मिळणार आहे.
विकेटकीपर- संजू सॅमसन (कर्णधार)
फलंदाज- ऋतुराज गायकवाड,अँडी बॅलबिर्नी, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा (उपकर्णधार), पॉल स्टिर्लिंग
अष्टपैलू- कर्टिस कॅम्पर, वॉशिंग्टन सुंदर
गोलंदाज- जसप्रीत बुमराह, रवि बिष्णोई, बेन मॅककार्थी
विकेटकीपर- संजू सॅमसन
फलंदाज- ऋतुराज गायकवाड, अँडी बॅलबिर्नी (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, पॉल स्टिर्लिंग
अष्टपैलू- कर्टिस कॅम्पर
गोलंदाज- जसप्रीत बुमराह (कर्णधार), क्रेग यंग, रवि बिष्णोई, मॅककार्थी