AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडिया कटकमधील 23 पैकी किती सामन्यांत विजय? पाहा आकडेवारी

Team India Record At Barabati Stadium : टी 20i वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये चौथा टी 20i सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताची या मैदानातील कामगिरी कशी राहिली आहे? जाणून घ्या.

Team India : टीम इंडिया कटकमधील 23 पैकी किती सामन्यांत विजय? पाहा आकडेवारी
KL Rahul Team IndiaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Dec 08, 2025 | 11:33 PM
Share

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याची सांगता ही टी 20i मालिकेने होणार आहे. उभयसंघात कसोटी आणि एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी तर भारताने एकदिवसीय मालिका जिंकली. त्यामुळे दोन्ही संघांची कामगिरी ही 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांचं लक्ष हे टी 20i मालिका जिंकण्याकडे आहे. या मालिकेत एकूण 5 टी 20i सामने होणार आहेत. पहिला सामना हा मंगळवारी 9 डिसेंबरला कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्यातील पहिला बॉल टाकला जाणार आहे. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाची या मैदानातील आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली आहे? हे आपण आकड्यांद्वारे जाणून घेऊयात.

टीम इंडियाची कटकमधील कामगिरी

टीम इंडियाने आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात या मैदानात एकूण 23 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारताने या मैदानात 23 पैकी सर्वाधिक 18 कसोटी सामने खेळले आहेत. भारताला 2 एकदिवसीय  सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. तर टीम इंडियाने बाराबती स्टेडियममध्ये 3 टी 20i सामने खेळले आहेत.

23 पैकी किती सामने जिंकलेत?

भारताने या मैदानात 23 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाला या मैदानात 6 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

टी 20i मधील आकडे

टीम इंडियाची ओडीशा क्रिकेट असोसिएशनच्या या स्टेडियममध्ये टी 20 सामन्यांत काही खास कामगिरी राहिलेली नाही. टीम इंडियाचा या मैदानातील 3 पैकी 2 टी 20i सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. तर एकमेव सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे टीम इंडिया 9 डिसेंबरला मालिकेत विजयी सलामी देत या मैदानातील दुसरा टी 20i सामना जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.