गोवा ट्रिप होईल स्वस्तात, फक्त फॉलो करा ‘या’ 5 स्मार्ट ट्रिक्स
हिवाळ्यात गोव्याला फिरायला गेलो की खूप खर्च होतो ट्रिप खूप महाग होते असं वाटत असेल तर तुम्ही योग्य फ्लाइट, हॉटेल आणि ट्रिपची वेळ निवडली तर तुम्ही कमी बजेटमध्येही गोव्याचे समुद्रकिनारे, किल्ले आणि नाईटलाइफचा आनंद घेऊ शकता. चला तर मग गोवा ट्रिपच्या बजेटबद्दल काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात.

जेव्हा जेव्हा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला जातो, तेव्हा अनेकदा आपल्या प्रत्येकाच्या मनात गोवा हे पहिले नाव येते. जर हिवाळा असेल आणि तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत किंवा मित्रांसोबत असाल, तर गोव्याची ट्रिप खरोखरच रोमांचक असते, कारण या थंडीच्या दिवसात गोवा फिरणे खरोखरच आल्हाददायक असते. पण तुम्ही गोव्याला ट्रिपला जाताना योग्य नियोजन करून गेल्यास तुम्हीही कमी बजेटमध्ये गोव्याचे समुद्र किनारे, नाईटलाईफ दृश्यांचा आनंद घेऊ शकता. तर आजच्या लेखात आपण तुमची गोवा ट्रिप कमी बजेट बरोबरच संस्मरणीय राहण्यासाठी काही सोपे टिप्स जाणून घेऊयात.
योग्य वेळ निवडा
हिवाळ्यात गोव्याला गर्दी असते. परंतु तुम्ही गोव्याला फिरायला जाण्यासाठी एक छोटीशी ट्रिक वापरू शकता. तुम्ही विकेंडच्या आतमध्ये जसे की सोमवार ते गुरुवार भेट देण्याचा प्रयत्न करा. कारण विकेंड सोडून इतर दिवशी गोव्याला गेलात तर विमान, हॉटेल आणि टॅक्सीचे दर हे विकेंडपेक्षा कमी असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही फक्त एक्सप्लोर करायचे आणि मजा करायचे असाल तर ख्रिसमस किंवा नवीन वर्ष यासारखे मोठे सण टाळा. या दिवसांमध्ये दर दुप्पट होतात आणि गर्दी देखील भरपूर असते.
तिकिटे लवकर बुक करा
तुम्हाला जर गोव्याची ट्रिप परवडणारी हवी असेल, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची गोव्याची तिकिटे लवकर बुक करा. तुमच्या ट्रिपच्या 45-60 दिवस आधी बुक करण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे वेळ असेल, तर ट्रेनचा प्रवास हा सर्वात उत्तम आणि आरामदायी आहे. अशातच तुम्ही विमान प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल, तर रात्रीच्या किंवा पहाटेच्या फ्लाइट शोधा या सहसा दिवसाच्या फ्लाइटपेक्षा स्वस्त असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही ट्रॅव्हल ॲपवर किंमत अलर्ट सेट करा जेणेकरून तिकिटाची किंमत कमी होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, ज्यामुळे तुम्ही बुक करू शकाल. या पद्धतीमुळे लक्षणीय बचत होऊ शकते.
किनाऱ्यावरील हॉटेलऐवजी…
तुम्हाला जर गोवा प्रवास तुमच्या बजेटमध्ये ठेवायचा असेल, तर महागड्या समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल्स टाळा. यासाठी समुद्रकिनाऱ्यापासून थोडे आतची हॉटेल शोधा ज्यांचा राहण्याचा रेट कमी असतो. त्याशिवाय हॉस्टेल देखील हा सर्वोत्तम पर्याय आहे. ते फक्त 400 ते 800 प्रति रात्र या दराने चांगल्या सुविधा देतात, ज्यामुळे तुम्ही जर एकटे प्रवास करत असाल किंवा मित्रांसोबत जाणार असाल तर तुम्ही होमस्टे किंवा गेस्ट हाऊस निवडू शकता, जे परवडणारे आहेत आणि खऱ्या स्थानिक अनुभव देतात. हा स्मार्ट दृष्टिकोन तुमच्या राहण्याच्या खर्चात हजारो रुपये वाचवू शकतो.
स्थानिक प्रवास खर्च कसा कमी करायचा?
स्थानिक प्रवास खर्च तुमच्या फिरण्याचा एक महत्त्वाचा भाग असतो, ज्याची किंमत सुमारे 4000 ते 5000 असू शकते. पण याव्यतिरिक्त तुम्ही सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे स्कूटर भाड्याने घेणे. गोव्यात तुम्ही दररोज फक्त 300 ते 500 रूपयांमध्ये स्कूटर भाड्याने घेऊ शकता. यामुळे तुम्ही समुद्रकिनारे, कॅफे, किल्ले आणि बाजारपेठा तुमच्या स्वतःच्या गतीने एक्सप्लोर करता येतात.
स्थानिक जेवणाचा आस्वाद घ्या
जेवणाच्या बाबतीत समुद्रकिनाऱ्यावरील महागडे कॅफे आणि फॅन्सी रेस्टॉरंट्स टाळणे योग्य तेचं ठरेल. जर तुम्हाला पैसे खर्च करायचे नसतील तर गोव्यातील स्थानिक ढाबे, लहान कॅफे किंवा स्टॉल्सचा पर्याय निवडा. येथील स्थानिक जेवण केवळ स्वादिष्टच नाही तर तुमच्या खिशावर कमी भार देखील पडतो. एका अंदाजानुसार, दोन लोकांसाठी दररोजचे शाकाहारी जेवण 500 ते 800 रूपयांच्या बजेटमध्ये सहज मिळू शकते. अशा प्रकारे तुम्ही पोटभर जेवणाचा आस्वाद घेऊ शकाल आणि पैसे वाचवाल.
भेट देण्यासाठी मोफत ठिकाणे निवडा
गोव्यात भेट देण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत जिथे एकतर तिकिट लागत नाही किंवा खूप कमी खर्च येतो. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घ्यायचा असेल, तर कलंगुट, बागा आणि अंजुना समुद्रकिनारे पूर्णपणे मोफत आहेत. येथे तुम्ही दिवसभर सूर्यप्रकाश, पाणी आणि मजा अनुभवू शकता. चापोरा आणि अगुआडा किल्ला हे किल्ला पाहण्यासाठी उत्तम पर्याय आहेत, जे नेत्रदीपक समुद्र दृश्ये देतात आणि स्वस्त खर्च देतात. खरेदीसाठी, मापुसा मार्केटला नक्की भेट द्या, जिथे तुम्ही स्थानिक वस्तू आणि गोव्याचे रंगीत वातावरण पाहू शकता.
