Krunal pandya: ‘मी खूप नकार पचवलेत’, हार्दिकच्या भावाने सांगितली माहिती नसलेली आयुष्याची दुसरी बाजू

| Updated on: Feb 09, 2022 | 8:15 PM

कृणाल पंड्या मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. पण यंदा त्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केलेलं नाहीय.

Krunal pandya: मी खूप नकार पचवलेत, हार्दिकच्या भावाने सांगितली  माहिती नसलेली आयुष्याची दुसरी बाजू
Hardik-krunal pandya (IPL)
Follow us on

मुंबई: अहमदाबादचा कॅप्टन झाल्यामुळे हार्दिक पंड्याची (Hardik pandya) सध्या सर्वत्र चर्चा आहे. पण त्याचा भाऊ कृणाल पंड्या (Krunal pandya) सुद्धा IPL मध्ये गेली काही वर्ष चांगली कामगिरी करत आहे. यंदाच्या इंडियन प्रिमियर लीगच्या स्पर्धेतही तशीच दमदार कामगिरी करुन दाखवण्याचा कृणाल पंड्याचा मानस आहे. कृणाल पंड्या मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. पण यंदा त्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केलेलं नाहीय. 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावात त्याच्यावर देखील मोठी बोली लागू शकते. ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत कृणाल पंड्याने मुंबई इंडियन्सने जेव्हा त्याला दोन कोटी रुपयांना विकत घेतलं, त्यावेळी भाऊ हार्दिक पंड्या सोबत झालेल्या संवादाची आठवण सांगितली. कृणाल या मुलाखतीत त्याच्या आतापर्यंतच्या क्रिकेट करीयरबद्दल सुद्धा व्यक्त झाला.

माझा प्रवास खूप वेगळा आहे
दुसऱ्यांशी तुलना केल्यास, माझा क्रिकेटमधला प्रवास खूप वेगळा होता. आयुष्यात खूप नकार पचवल्याचं त्याने सांगितलं. “दुसऱ्या क्रिकेटपटूंच्या तुलनेत माझा प्रवास खूप वेगळा आहे. मी वयाच्या 25 व्या IPL मध्ये खेळलो. तुम्ही चांगले खेळत असाल, तर भारतात 21, 22 आणि 23 वर्षापर्यंत तुम्हाला संधी मिळते. माझ्या आयुष्यात मी अनेक नकार पचवलेत. पण मी स्वत:बदल जो विचार करतो, त्यामुळे मी आज इथवर पोहोचू शकलो” असे कृणाल पंड्या म्हणाला.

तेव्हा हार्दिक मला म्हणाला होता…
“मी मुंबई इंडियन्ससाठी प्रथम खेळलो, तेव्हा ‘लिस्ट ए’ चे चार सामने खेळलो होतो. टी-20 च्या पंधरा सामन्यांचा अनुभव होता. प्रथम श्रेणीचा एकही सामना खेळलो नव्हतो. मला मुंबई इंडियन्सने दोन कोटी रुपयांना विकत घेतलं, तो दिवस मला अजून आठवतोय. तुला इतके पैसे मिळालेत, त्यामुळे तुला चांगली कामगिरी करावीच लागेल, असं हार्दिक मला म्हणाला होता. त्यावेळी मी त्याला, शांत रहा, मी चांगला खेळ दाखवीन एवढच म्हटलं होतं” ही आठवण कृणालने सांगितली.

मला एका पुस्तकाची मदत झाली
“कृणाल पंड्याने त्याच्या आयुष्यातील नकारात्मक बाजूबद्दलही सांगितलं. तेव्हा एका पुस्तकाची त्याला मदत झाली होती. 2019 मध्ये माझ्या मनात खूप नकारात्मकता भरली होती. प्रत्येकजण अशा फेजमधून जातो, जेव्हा त्याच्या मनात स्वत:बद्दल शंका निर्माण होते. माझ्या डोक्यात अनेक गोष्टी चालू होत्या. त्यावेळी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला एका पुस्तकाची मदत झाली” असं कृणाल पंड्याने सांगितलं.

I have had lot of rejections hardiks brother krunal pandya who played for mumbai indians