IND vs WI: ‘ऐक, आम्हाला तुझ्याकडून…’ पंतला सलामीला पाठवण्याच्या प्रयोगावर गावस्कर म्हणतात….

वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs west indies) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh pant) चौथ्या तर आज दुसऱ्या सामन्यात सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला. के

IND vs WI: 'ऐक, आम्हाला तुझ्याकडून...' पंतला सलामीला पाठवण्याच्या प्रयोगावर गावस्कर म्हणतात....
gavaskar-Rishabh (BCCI)
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 7:17 PM

अहमदाबाद: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs west indies) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh pant) चौथ्या तर आज दुसऱ्या सामन्यात सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला. केएल राहुल संघात परतला असला, तरी त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. रोहित शर्मा आणि ऋषभ पंतने आज डावाची सुरुवात केली. अनेकांना या चालीने धक्का बसला. यामध्ये कॉमेट्री बॉक्समधून कॉंमेंट्री करणारे सुनील गावस्करही (Sunil gavaskar) होते. राहुलने मधल्याफळीत नेहमीच चांगली फलंदाजी केली आहे. आकडेच त्याबद्दल सर्वकाही सांगून जातात. त्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला असावा. ऋषभ पंतला सलामीला पाठवण्याच्या निर्णयावर गावस्कर म्हणाले की, “पहिल्या पावरप्लेमध्ये झटपट आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा उद्देश असू शकतो. पुढच्यावर्षी 2023 मध्ये होणारी वर्ल्डकप स्पर्धा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असावा”

म्हणून घेतला असावा निर्णय “पंतला सलामीला पाठवण्याच्या निर्णयामागे पहिल्या 10 षटकांचा विचार केला असावा. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये कधीकधी भारताकडून अपेक्षित धावा होत नाहीत. त्यामुळे ऋषभ पंत फिल्डिंगवर असलेल्या मर्यांदाचा फायदा उचलेल, असे त्यांना वाटत असावे. हा एक प्रयोग होता. ही चाल यशस्वी ठरली, तर पुढच्या वर्ल्डकपमध्येही हेच चित्र दिसू शकतं” असं गावस्कर म्हणाले.

मग फिनिशर कोण? पंतला सलामीला आला, तर फिनिशरची जागा रिकाम रहाते, याकडे गावस्करांनी लक्ष वेधलं. हार्दिक पंड्या पूनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये आहे. रवींद्र जाडेजा अजूनही खांद्याच्या दुखापतीमधून सावरलेला नाही. गावस्करांच्या मते पंतला सलामीला आणण्यामागे त्याला जबाबदारीची जाणीव करुन देण्याचा देखील उद्देश असू शकतो. जबाबदारीचं भान देण्याचा देखील उद्देश असू शकतो “फिनिशर कोण ? हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. मला असं वाटत होतं की, ते पंतकडे फिनिशर म्हणून पाहत असतील. जो प्रत्येक चेंडू मारण्याचा प्रयत्न करतो. सलामीला पाठवून त्याला जबाबदारीची जाणीव करुन देण्याचा देखील उद्देश असू शकतो. पहिलाच चेंडू मारण्याच्या प्रयत्नात त्याला बाद होताना आपण पाहिलय. त्यामुळे वरती पाठवून जबाबदारीचं भान देण्याचा देखील उद्देश असू शकतो. ऐक आम्हाला तुझ्याकडून धावांची अपेक्षा आहे” असे गावस्कर म्हणाले.

Listen we expect runs from you Gavaskar on India’s Pant experiment

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.