Ravi Shastri on Jasprit Bumrah : ‘अजूनही विद्यार्थी असल्यासारखं वाटतंय…,’ बुमराहच्या धडाकेबाज कामगिरीवर रवी शास्त्रींची प्रतिक्रिया, BCCIकडून व्हिडीओ ट्विट

| Updated on: Jul 02, 2022 | 8:32 PM

Ravi Shastri on Jasprit Bumrah : वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्याने 35 धावा दिल्या . कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले. यापूर्वी ब्रायन लाराने 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या आर पीटरसनविरुद्धच्या षटकात 28 धावा केल्या होत्या. बुमराहच्या धडाकेबाज कामगिरीवर कौतुकांचा वर्षाव होतोय. आधी सचिन तेंडुलकर त्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणालेत जाणून घ्या...

Ravi Shastri on Jasprit Bumrah : अजूनही विद्यार्थी असल्यासारखं वाटतंय..., बुमराहच्या धडाकेबाज कामगिरीवर रवी शास्त्रींची प्रतिक्रिया, BCCIकडून व्हिडीओ ट्विट
जसप्रीत बुमराह
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) धडाकेबाज कामगिरीवर कौतुकांचा वर्षाव होतोय. आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं कौतुक केलं, त्यानंतर आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी देखील बुमराहवर बोललं आहे. आज (शनिवार) बुमराहनं इंग्लंडमध्ये आपल्या फलंदाजीनं इतिहास रचला. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्यानं तब्बल 35 धावा काढल्या आहेत. ही मोठा विश्वविक्रम त्यानं केलाय. 1877 पासून म्हणजेच 145 वर्षांच्या कसोटी इतिहासातील ब्रॉडचं सर्वात महागडे षटक आहे, असं क्रीडा विश्वातले जाणकार म्हणतायत. या सामन्यात ब्रॉडनं कारकिर्दीतील 550वी विकेटही घेतली. पण यासोबत त्यानं एक लाजिरवाणा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. दरम्यान, एका षटकात बुमराहनं तब्बल 35 धावा काढल्यानं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. यामध्ये सचिन तेंडुलकर याच्यानंतर आता रवी शास्त्रींना देखील बुमराहवर बोललं आहे.

रवी शास्त्री काय म्हणालेत?

बीसीसीआयनं भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक व्हिडीओ ट्विट केलाय. त्यात ते म्हणातात की, ‘जेव्हा बुमराहनं एका ओव्हरमध्ये 35 धावा दिल्या, तेव्हा मी काय विचार करत होतो ते विचारू नका. यापूर्वी युवराज सिंग आणि मी एका षटकात 36 धावा केल्या होत्या. पण बुमराहनं जे केलं ते अकल्पनीय आहे. बुमराहनं विश्वविक्रम केला. तो दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो प्रथमच संघाचे कर्णधारपदही भूषवत आहे. त्यांनी ब्रायन लारा, जॉर्ज बेली आणि केशव महाराज यांना मागे सोडले. ते पुढे म्हणाले की, ‘मला वाटलं की मी हे सगळं पाहिलं असेल, पण खरंच नाही. तुम्हाला असे वाटते की तुम्ही सर्व काही पाहिलंय. पण, तुम्हाला हे समजलं पाहिजे की तुम्ही अजूनही गेममध्ये विद्यार्थी आहात. दुसर्‍या दिवशी तुम्हाला काहीसे आश्चर्य वाटेल. पण, आज काहीतरी वेगळं घडत असल्याचं मला दिसलं. जसप्रीत बुमराहनं आपल्या बॅटने 35 षटकात 29 धावा करण्याचा विश्वविक्रम मोडलाय.

हे सुद्धा वाचा

रवी शास्त्रींचा बीसीसीआयनं ट्विट केलेला व्हिडीओ

बुमराहनं नेमकं काय केलं?

प्रथमच भारतीय संघाचे कर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहने 16 चेंडूत 31 धावा केल्या आणि पहिल्या डावात नाबाद परतला. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्याने 35 धावा दिल्या . कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले. यापूर्वी ब्रायन लाराने 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या आर पीटरसनविरुद्धच्या षटकात 28 धावा केल्या होत्या. त्याचवेळी, 2013 मध्ये जॉर्ज बेलीनेही जेम्स अँडरसनच्या षटकात 28 धावा केल्या होत्या. 2020 मध्ये, केशव महाराजने इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटच्या षटकात 28 धावा दिल्या होत्या.जसप्रीत बुमराहने  84 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 4 धावा काढल्या. दुसरा चेंडू वाईड होता आणि त्यावर 4 धावाही घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर बुमराहने षटकार ठोकला जो नो-बॉल होता. पुढच्या 3 चेंडूत बुमराहने ब्रॉडवर सलग 3 चौकार मारले. त्याने 5व्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर धाव घेतली. अशा प्रकारे षटकात एकूण 35 धावा झाल्या.