Icc : श्रीलंकेचे 4 आणि पाकिस्तानचे 3, आयसीसीकडून 2024 मधील सर्वोत्तम वनडे प्लेइंग ईलेव्हन जाहीर, टीम इंडियाला मोठा धक्का

ICC Mens ODI Team of the Year for 2024 : आयसीसीने 2024 या वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. आयसीसीने या संघात एकूण 11 खेळाडूंचा समावेश केला आहे.

Icc : श्रीलंकेचे 4 आणि पाकिस्तानचे 3, आयसीसीकडून 2024 मधील सर्वोत्तम वनडे प्लेइंग ईलेव्हन जाहीर, टीम इंडियाला मोठा धक्का
Rohit virat team india odi
Image Credit source: K L Rahul X Account
| Updated on: Jan 24, 2025 | 2:25 PM

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी गमवावी लागली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशा फरकाने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह तब्बल 10 वर्षांनी बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या स्पर्धेतून बाहेर फेकलं. टीम इंडियासाठी हा मोठा झटका होता. टीम इंडियाने हे सर्व मागे टाकत 2025 या नववर्षाची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या टी 20 सामन्यात विजय मिळवला. मात्र त्यानंतर टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. आयसीसीने 2024 या वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

आयसीसीच्या 2024 या वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघात एकूण 11 खेळाडूंचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या 12 खेळाडूंमध्ये टीम इंडियाच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही. आयसीसीच्या या संघात श्रीलंकेच्या सर्वाधिक 4 खेळाडूंचा समावेश आहे. पाकिस्तानच्या 3 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर विंडीजच्या एका खेळाडूला घेतलं आहे. तर श्रीलंकेच्या खेळाडूला कर्णधार करण्यात आलंय.

एकही भारतीय खेळाडू नाही

आयसीसीने या संघात 2024 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश केला आहे. टीम इंडियाने 2023 वनडे वर्ल्ड कपपासून फक्त 2 एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या एकाही खेळाडूचा या संघात समावेश नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र तसं असलं तरी सुद्धा भारतीय संघाचा एकही खेळाडू नसल्याने नाराजी आणि आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आयसीसीचा 2024 वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर

आयसीसीची 2024 वर्षातील सर्वोत्तम वनडे प्लेईंग ईलेव्हन : चरिथ असलंका (कॅप्टन), सॅम अय्युब, रहमानुल्लाह गुरुबाझ, पाथुम निसांका,कुसल मेंडीस (विकेटकीपर), शेरफेन रुदरफोर्ड, अझमतुल्लाह ओमरझई,वानिंदु हसरंगा, शाहीन शाह अफ्रिदी, हरिस रौफ आणि अली गझनफर.