Icc | आयसीसीची मोठी घोषणा, रोहित शर्मा-विराट कोहली याच्यासाठी आनंदाची बातमी

Icc Test Ranking | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका पार पडली. त्यानंतर आयसीसीने टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. टॉप 10 मध्ये टीम इंडियाचे 2 फलंदाज आहेत.

Icc | आयसीसीची मोठी घोषणा, रोहित शर्मा-विराट कोहली याच्यासाठी आनंदाची बातमी
| Updated on: Jan 10, 2024 | 8:06 PM

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी 20 मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होतेय. या मालिकेत रोहित शर्मा हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर विराट कोहली पहिल्या सामन्यातून वैयक्तिक कारणांमुळे बाहेर पडला आहे. या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे ओपनिंग करणार आहेत. पहिल्या सामन्याची लगबग सुरु असताना रोहित आणि विराट या दोघांना गूड न्यूज मिळाली आहे. आयसीसीने ही गोड बातमी दिली आहे.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्सने पराभूत केलं. यासह टीम इंडिया मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना चांगलाच फायदा झाला आहे. रोहितने पहिल्या 10 फलंदाजांमध्ये एन्ट्री घेतली आहे. तर विराटने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. टेस्ट बॅट्समन रँकिंगमध्ये विराटच्या सोबतीला आता रोहितही आला आहे.

रोहितला टेस्ट बॅट्समन रँकिंगमध्ये 4 स्थानांचा फायदा झाला आहे. त्यामुळे रोहितने थेट 14 व्या स्थानावरुन 10 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. रोहितची रेटिंग ही 748 इतकी आहे. तर विराट नवव्यावरुन सहाव्या क्रमांकावर आला आहे. तर न्यूझीलंडचा केन विलियमनस हा नंबर आहे. इंग्लंडचा जो रुट दुसऱ्या आणि स्टीव्हन स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बॉलिंग रँकिंगमध्ये अश्विन नंबर 1

तसेच आयसीसी टेस्ट बॉलिंग रँकिंगमध्ये टीम इंडियाचा आर अश्विन हाच नंबर 1 वर आहे. अश्विन आपलं अव्वल स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. पॅट दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याची दुसऱ्यावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

टेस्ट रँकिंगमध्ये कोण कुठे?

जसप्रीत बुमराहला फायदा

दरम्यान या बॉलिंग रँकिंगमध्ये टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला फायदा झाला आहे. बुमराह पाचव्यावरुन चौथ्या क्रमांकावर आला आहे. तर रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. बुमराहने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 5 विकेट्स घेतल्या होत्या. याचाच फायदा बुमराहला झाला आहे.