AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG | रोहितसोबत ओपनिंग कोण करणार? कोच द्रविड यांनी नावच सांगितलं

India vs Afghanistan 1st T20I | विराट कोहली पहिल्या सामन्यातून बाहेर झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का लागला. राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत विराट सलामीच्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच रोहितसोबत ओपनिंग करणाऱ्या फलंदाजांचं नावही सांगितलं.

IND vs AFG | रोहितसोबत ओपनिंग कोण करणार? कोच द्रविड यांनी नावच सांगितलं
rahul dravid
| Updated on: Jan 10, 2024 | 7:22 PM
Share

मुंबई | अफगाणिस्तान विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली खेळणार नसल्याचं मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं. विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे पहिल्या टी 20 सामन्यात खेळणार नसल्याचं द्रविड यांनी सांगितलं. मात्र विराट त्यानंतर उर्वरित मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे. या माहितीसह द्रविड यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच विराट नसल्याने आता रोहितसोबत ओपनिंग कोण करणार, याबाबतही द्रविड यांनी स्पष्ट सांगितलं.

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी कमबॅक केलं. त्यामुळे रोहितसोबत ओपनिंग कोण करणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित करण्यात आला. कारण टीममध्ये शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली असे तिघेही तोडीसतोड ओपनर होते. मात्र आता विराट पहिल्या सामन्यात नसणार आहे. यामुळे रोहितसह ओपनिंगला येण्यासाठी शुबमन आणि यशस्वी या दोघांची नाव चर्चेत आली. यावर द्रविड यांनी कोणतीही लपवाछपवी न करता रोहितसोबत कोण ओपनिंग करणार, ते सांगितलं.

मुंबईकर करणार टीम इंडियाची ओपनिंग

रोहित शर्मासोबत युवा मुंबईकर फलंदाज यशस्वी जयस्वाल हा ओपनिंग करणार आहे. राहुल द्रविड यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे क्रिेकेट चाहत्यांना आणखी एक नवी ओपनिंग जोडी आता पाहायला मिळणार आहे. यशस्वी रोहितसोबत कशाप्रकारे ओपनिंग करतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

मुंबईकर करणार टीम इंडियाची सुरुवात

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.