Icc Champions Trophy 2025 : टीम इंडिया दुबईला पोहचताच आयसीसीची मोठी घोषणा, नक्की काय?

Icc Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी दुबईत दाखल होताच आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.

Icc Champions Trophy 2025 : टीम इंडिया दुबईला पोहचताच आयसीसीची मोठी घोषणा, नक्की काय?
team india rohit harshit shreyas iyer
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 16, 2025 | 2:31 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत दाखल झाली आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे टीम इंडिया संपूर्ण सामने हे सुरक्षेच्या दृष्टीने दुबईत खेळणार आहे. टीम इंडिया या मोहिमेतील पहिला सामना हा 20 फेब्रुवारीला खेळणार आहे. तर 23 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आशिया कप आणि आयसीसी ट्रॉफी स्पर्धेत भिडतात. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या महामुकाबल्याची कायम प्रतिक्षा असते. आयसीसीने 3 फेब्रुवारीला साखळी फेरीतील सामन्यांसाठी तिकीट विक्रीला सुरुवात केली होती. मात्र अवघ्या काही मिनिटांत सर्व तिकीटं विकली गेली. त्यानंतर आता आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे.

आयसीसीची मोठी घोषणा

या स्पर्धेत एकूण 8 सहभागी संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. टीम इंडियाचे साखळी फेरीतील सर्व सामने हे दुबईत खेळणार आहे. तसेच टीम इंडियाने बाद फेरीत प्रवेश केला, तरीही ते सामने इथेच दुबईत खेळवण्यात येतील. साखळी फेरीतील सामन्यांची तिकीट अवघ्या काही क्षणांत विकली गेली. त्यामुळे इतर क्रिकेट चाहत्यांना तिकीट मिळाली नाहीत. त्यामुळे आता आयसीसीने टीम इंडियाच्या सामन्यांसाठी अतिरिक्त तिकीटं उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

तिकीटासाठी काय करावं लागेल?

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, 16 फेब्रुवारी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी अतिरिक्त तिकीट विक्रीला सुरुवात होईल. क्रिकेट चाहते टीम इंडियाच्या साखळी फेरीतील सर्व सामन्यांची तिकीटं खरेदी करु शकतात. तसेच 4 मार्चला दुबईत होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यांचे तिकीटही यावेळेस उपलब्ध असणार आगेत. क्रिकेट चाहते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करु शकतात.

क्रिकेट चाहत्यांना दिलासा

टीम इंडियाचं वेळापत्रक

विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी

विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी

विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.