IND vs BAN : भारत-बांगलादेश सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
Bangladesh vs India Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या मोहिमेतील सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे.

टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रबळ दावेदार आहे. टीम इंडियाचा या स्पर्धेत विजयाने कुरुवात करण्याचा मानस असणार आहे. टीम इंडिया ए गुपमध्ये असून साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडिया एकही सामना गमावण्याचा धोका पत्कारु शकत नाही. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंडचा एकदिवसीय मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास वाढलेला आहे. त्यामुळे टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया सामना केव्हा?
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया यांच्यात गुरुवारी 20 फेब्रुवारीला सामना खेळवण्यात येणार आहे.
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया सामना कुठे?
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होणार आहे.
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर जिओहॉटस्टारवर पाहायला मिळेल.
बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), झाकेर अली (विकेटकीपर), सौम्या सरकार, तन्झिद हसन, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, नाहिद राणा, मुस्तफिजुर रहमान, तॉहिद हृदोय, रिशाद हुसैन, परवेझ नसुम इमॉन आणि नसूम अहमद.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर.