Team India : टीम इंडियासमोर उपांत्य फेरीत कुणाचं आव्हान? सामना केव्हा?

Icc Champions Trophy 2025 Semi Final : आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीची सांगता झाली आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर मात करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

Team India : टीम इंडियासमोर उपांत्य फेरीत कुणाचं आव्हान? सामना केव्हा?
virat rohit hardik team india
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Mar 02, 2025 | 10:53 PM

टीम इंडियाने रविवारी 2 मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने 250 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला 244 धावांवर गुंडाळलं. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. टीम इंडियाचा हा साखळी फेरीतील सलग तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने गेल्या रविवारी 23 फेब्रुवारीला पाकिस्तानला पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला आणि अ गटातून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. तर बी ग्रुपमधून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत धडक दिली होती. मात्र टीम इंडिया उपांत्य फेरीत बी ग्रुपमधील कोणत्या टीमविरुद्ध खेळणार? हे चित्र स्पष्ट झालं नव्हतं. मात्र आता न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियासमोर सेमीफायलनमध्ये कुणाचं आव्हान असणार? हे स्पष्ट झालं आहे.

न्यूझीलंडला पछाडलं, टीम इंडिया नंबर 1

न्यूझीलंडला पराभूत करत टीम इंडिया साखळी फेरीत ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 ठरली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे. उपांत्य फेरीसाठी 4 संघ केव्हाच निश्चित झाले होते. मात्र ए ग्रुपमधील न्यूझीलंड विरुद्ध इंडिया सामन्याच्या निकालावर उपांत्य फेरीतील सर्व समीकरण अवलंबून होतं. मात्र आता निकालानंतर सर्व स्पष्ट झालं आहे.

टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक

दरम्यान टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी साखळी फेरीत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाने 20 फेब्रुवारीला बांगलादेशवर 6 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर 23 फेब्रुवारीला रविवारी पाकिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. तर आता न्यूझीलंडवर मात करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

वरुणचा किवींना पंच

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओरुर्के.