
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात 20 फेब्रुवारीला भारताने शेजारी बांगालदेशवर विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत बांगलादेशला 46.3 ओव्हरमध्ये 228 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे भारताला 229 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान 46.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. मोहम्मद शमी आणि उपकर्णधार शुबमन गिल हे दोघे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मोहम्मद शमी याने आधी 5 विकेट्स घेतल्या. तर शुबमन गिल याने नाबाद 101 धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्मा याने 36 चेंडूत 7 चौकारांसह 41 धावांचं योगदान दिलं. रोहित या खेळीसह एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 11 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. सर्वात वेगवान 11 हजार धावा करण्याचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे.
रोहित शर्माने या विजयासह महारेकॉर्ड केला. बांगलादेशविरुद्धचा विजय हा रोहित शर्मा याचा कर्णधार म्हणून 100 वा आंतरराष्ट्रीय विजय ठरला. रोहितने 139 व्या सामन्यात ही कामगिरी केली. टीम इंडियाचा या स्पर्धेतील दुसरा सामना हा पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा महामुकाबला रविवारी 23 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने पाकिस्तानला थेट इशाराच दिलाय.
रोहित शर्मा याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानला इशारा दिला. “आतापर्यंत या स्टेडियममध्ये अनेक सामने खेळले गेले आहेत. अशात आम्ही 23 तारखेलाही इथेच खेळणार आहोत आणि पाहू की खेळपट्टी कशी असेल ते”, असं रोहितने म्हटलं.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान क्रिकेट टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि सौद शकील.