AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan | वर्ल्ड कप आधी टीम इंडिया-पाकिस्तानमध्ये कडवी झुंज

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघामधील सामन्याची क्रिकेट चाहते आवर्जून वाट पाहत असतात. सध्या हे दोन्ही टीम आशिया कप आणि आयसीसी ट्रॉफी स्पर्धेतच खेळतात.

India vs Pakistan | वर्ल्ड कप आधी टीम इंडिया-पाकिस्तानमध्ये  कडवी झुंज
| Updated on: May 11, 2023 | 6:03 PM
Share

मुंबई | टीम इंडिया आणि पाकिस्तान, दोन कट्टर प्रतिस्पर्धी. दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधामुळे भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका झालेली नाही. दोन्ही संघ सध्या आयसीसी ट्रॉफी आणि आशिया कप स्पर्धेत खेळतात. यंदा आशिया कप स्पर्धा आयोजनाचा विषय चांगलाच तापलाय. आशिया कपच्या आयोजनासाठी योग्य ठिकाणाची पडताळणी केली जात आहे. पाकिस्तान-टीम इंडिया सामन्यासाठी त्रयस्थ ठिकाणाचा शोध सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आशिया कपमध्ये दोन्ही संघांचा आमनासामना होणार की नाही, हे अजूनही स्पष्ट नाही. तर दुसऱ्या बाजूला हे दोन्ही संघ आगामी वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार असल्याचं नक्की आहे.

वर्ल्ड कपला आतापासून किमान 5 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. पण त्याआधी टीम इंडिया-पाकिस्तान या दोघांमध्ये कडवी झुंज होत असल्याचं दिसतंय. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी रँकिंगमध्ये पुढे राहण्याबाबत रस्सीखेच दिसून येत आहे. या खेचाखेचीत पाकिस्तानने टीम इंडियावर मात केलीय. पाकिस्तानने आयसीसी रँकिंगमध्ये किंचित अशी आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाचे खेळाडू हे सध्या आयपीएल 16 व्या मोसमात मैदान गाजवत आहे. तर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20 नंतर एकदिवसीय मालिका पार पडली. पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम याने या मालिकेत चमकदार कामगिरी केली. न्यूझीलंडने या मालिकेत पाकिस्तानवर 4-1 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला. पाकिस्तानला याचाच फायदा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये झाला.

पाकिस्तानने टीम इंडियाला पछाडलं

आयसीसीने गुरुवारी 11 मे रोजी एकदिवसीय वार्षिक क्रमवार जारी केली. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपलं सिहांसन कायम ठेवत अव्वल क्रमांक अबाधित ठेववाय. तर गेल्या आठवड्यापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर असलेली टीम इंडियाची घसरण ही तिसऱ्या क्रमांकावर झाली. तर पाकिस्तानने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचे आतापर्यंत 113 पॉइंट्स होते. मात्र आता ताज्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलियाचे 11 पॉइंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत टीम इंडिया 3 पॉइंट्सने पिछाडीवर आहे. टीम इंडियाच्या नाववर 115 पॉइंट्स आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने 4 पॉइंट्सची झेप घेत 112 वरुन थेट 116 वर उडी घेतली आहे.

आता तुम्ही म्हणाल की मध्येच कुठून वनडे वार्षिक रँकिंग, तर ते आपण जाणून घेऊयात. याचे निकष काय आहेत, हे समजून घेऊयात. आयसीसीनुसार, वार्षिक रँकिंगमध्ये मे 2020 पासून झालेल्या एकदिवसीय मालिकांचे निकाल ग्राह्य धरण्यात आले आहेत. तर मे 2022 पर्यंतच्या मालिकांच्या निकालांना 50 टक्केच महत्व देण्यात आलं आहे. तसेच यानंतरच्या प्रत्येक मालिकेला 100 टक्के प्राधान्य आहे. यानुसार, टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा फटका बसला.

आता या वनडे रँकिंगमधील चढाओढ आगामी वर्ल्ड कपपर्यंत सुरुच राहणार आहे. या दरम्यान दोन्ही संघांमध्ये 2 सामने आयोजि आहेत. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनंतरनंतर विंडिंज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा चमकदार कामगिरी करुन रँकिंगमध्ये धमाका करण्याचा प्रयत्न असेल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.