
मुंबई | टीम इंडिया-पाकिस्तान या दोन्ही संघांचा नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप 2023 स्पर्धेत एकूण 2 वेळा आमनासामना झाला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर सुपर 4 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा तब्बल 228 धावांनी धुव्वा उडवला. त्यानंतर ‘करो या मरो’ सामन्यात श्रीलंका टीमने अखेरच्या बॉलवर 2 धावा घेत पाकिस्तानचं आशिया कप 2023 मधून पत्ता कट केला. मात्र यानंतर सुपर 4 मधील अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभूत व्हावं लागलं.
बांगलादेशच्या या विजयाचा फायदा हा पाकिस्तानला झाला. बांगलादेश विजयी झाल्याने पाकिस्तान आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहचली. मात्र हा पाकिस्तानचा रुबाब थोड्याच दिवसांसाठी आहे. कारण टीम इंडियाला पाकिस्तानला धोबीपछाड देऊन वनडेत नंबर होण्याची संधी आहे. टीम इंडिया आशिया कप 2023 नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाला एक नंबर होण्याची मोठी संधी आहे.
आयसीसीने नुकतीच आयसीसी वनडे रँकिंग जाहीर केली आहे. त्यामध्ये पाकिस्तान अव्वल स्थानी आहे. तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर. पाकिस्तानचे रेटिंग्स पॉइंट्स 114,889 इतके आहेत. तर टीम इंडियाच्या नावावर 114,659 रेटिंग्स आहेत. पाकिस्तान आणि टीम इंडिया यांच्यात फक्त 230 रेटिंग्सचा फरक आहे.
आयसीसी वनडे रँकिंग
India and Australia both have a chance to regain the top spot in the @MRFWorldwide ICC Men’s ODI Team Rankings when they face-off later this week.
More ➡️ https://t.co/mIT7iCarHq pic.twitter.com/7GfIMJXvBZ
— ICC (@ICC) September 18, 2023
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात 22-27 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. टीम इंडियाला मालिकेतील पहिला सामना जिंकून वनडे रँकिंगमध्ये पहिलं स्थान काबीज करण्याची संधी आहे. या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची 18 सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात येणार आहे. तर ऑस्ट्रेलियाने 17 सप्टेंबरला टीम जाहीर केलीय. त्यामुळे आता पहिला सामना जिंकून टीम इंडिया नंबर 1 होते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.