IND vs AUS | टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी घोषणा केव्हा? तारीख-वेळ फिक्स
India vs Australia Odi Series 2023 | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या घोषणेची तारखेसह वेळही ठरली आहे.

मुंबई | टीम इंडियाने आशिया कप 2023 स्पर्धा जिंकली. टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 10 विकेट्सने विजय मिळवत आठव्यांदा आशिया कप उंचावला. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2018 नंतर पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली. आता त्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपआधी ही मालिका टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियासाठी फार महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी रविवारी 17 सप्टेंबर रोजी 18 सदस्यीय संघ जाहीर केला. पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, असा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी सोमवारी 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघ जाहीर करणार आहेत. या मालिकेसाठी टीम इंडियात वर्ल्ड कपसाठी संधी मिळालेल्याच खेळाडूंचीच निवड होणार असल्याची तीव्र शक्यता आहे. मात्र श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल हे दोघे दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे या दोघांच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया टीमबाबत महत्त्वाचं
ऑस्ट्रेलिया टीममध्ये या मालिकेसाठी स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल या तिघांचं कमबॅक झालं आहे. कॅमरुन ग्रीन हा देखील दुखापतीनंतर परतलाय. तर ट्रॅव्हिस हेड हा दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही.
वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.
ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, शुक्रवार 22 सप्टेंबर.
दुसरा सामना, रविवार, 24 सप्टेंबर.
तिसरा सामना, बुधवार 27 सप्टेंबर.
